शरद पवारसाहेब पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्या
कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी
कागल/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा आणि अध्यक्षपदी कायम राहावे, अशी आग्रही मागणी कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्या नेतृत्वाखाली बस स्टँडजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकत्र जमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री. पवार यांच्याकडे ही आग्रही मागणी केली आहे. यावेळी श्री. पवार यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.