Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याकरवीर पीठाचे पुरस्कार जाहीर – विद्यानृसिंह भारती, आद्य शंकराचार्यांचा जयंती उत्सव ३०...

करवीर पीठाचे पुरस्कार जाहीर – विद्यानृसिंह भारती, आद्य शंकराचार्यांचा जयंती उत्सव ३० एप्रिलपासून

करवीर पीठाचे पुरस्कार जाहीर – विद्यानृसिंह भारती आद्य शंकराचार्यांचा जयंती उत्सव ३० एप्रिलपासून

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील श्रीमद जगदगुरू शंकराचार्य पीठाचा आद्य शंकराचार्यांचा २५३१ वा जयंती उत्सव येत्या ३० एप्रिलपासून सुरू होणार असून या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत आद्य शंकराचार्यांचा जयंती उत्सव होत असून यामध्ये हवन, पूर्णाहूती, कीर्तन, प्रवचन या बरोबर धर्माची पताका उंचावण्यासाठी हातभार लावणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
स्वामीजी म्हणाले, एकूण आठ पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये वेद शास्त्र संपन्न मल्लारी विष्णू धर्माधिकारी यांच्या नावे वैदिक पुरस्कार सुशांत वासुदेव वझे, गोवा, श्रीपाद शास्त्री बंडोपंत जेरे – शास्त्री पुरस्कार मधुसुदन पेन्ना, रामटेक, नरहरबुआ कराडकर – कीर्तनकार पुरस्कार अशोक गणेश उपाध्ये, ठाणे, श्रीपाद सीताराम गोसावी – स्थानिक वैदिक पुरस्कार प्रदीप जोशी, औदुंबर, विद्याशंकर भारती स्वामी- सामाजिक गौरव – विभागून दिलीप देशमुख, बीड व राजेंद्र वीर, बीड, श्रीमती लक्ष्मीबाई आळतेकर – महिला कीर्तनकार – वंदना प्रदीप जोशी, गोवा, वेद चुडामणी रंगनाथ आळतेकर – होतकरू विद्यार्थी पुरस्कार, विश्वंभर कानशुक्ले, नांदेड व प्रमोद कुलकर्णी, परभणी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असेल.
दरम्यान, सर्व कार्यक्रम पीठामध्ये होतील. यामध्ये पुरस्कार वितरण प.प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते ५ मे रोजी सकाळी दहा वाजता होईल. शुक्रवारी ५ मे रोजी दुपारी १२ महाप्रसाद, पालखी प्रदक्षिणा सायंकाळी ५ वाजता भक्तांच्या उपस्थितीत आयोजित केली आहे.आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विद्यानृसिंह भारती यांनी यावेळी केले. कार्यवाह शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments