Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्या"चंद्रकांत चषक -२०२३" फुटबॉल स्पर्धेत शिवाजीचा अंतिम फेरीत प्रवेश"

“चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत शिवाजीचा अंतिम फेरीत प्रवेश”

“चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत शिवाजीचा अंतिम फेरीत प्रवेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना आज शिवाजी तालीम मंडळ (पीटीएम) विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात शिवाजी संघाने दिलबहारचा २-० पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्याची सुरवात कोल्हापूर उद्यम सोसायटीचे अध्यक्ष दिनेश बुधले, अध्यक्ष दीपक पाटील, गोशीमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, सीआयआयचे उपाध्यक्ष अजय सप्रे, इंजिनियरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, उद्योजक चंद्रकांत चोरगे, संगीता नलवडे, राजन सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली.
शिवाजी विरूध्द दिलबहारचा सामन्यात पूर्वार्धात १६व्या मिनिटाला संदेश कासार यांने गोल केला. मध्यंत्तरापर्यंत शिवाजीने १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात मध्ये ४९ व्या मिनिटाला करण चव्हाण बंदरे यांने गोल केला आणि आघाडी २-० गोलची आघाडी घेतली. सामन्याच्या पूर्ण वेळेत शिवाजी संघाने २-० असा, दिलबहारचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संदेश कासार यांची निवड झाली. रोहित पाटील, राहुल पाटील,मधुकर चौगुले, युवा उद्योजक सत्यजित जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
चंद्रकांत चषक २०२३ स्पर्धेतील विजेते व उपविजेत्यांना मिळणार Copa America Cup सारखा चषक देण्यात येणार आहे. या चषकाचे अनावरण आदरणीय मालोजीराजे छत्रपती, आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.दरम्यान, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांचा ५१ वा वाढदिवस फुटबॉल मैदानाच्या आकारातील केक कापून साजरा करण्यात आला. त्यांना भेट स्वरूपात वह्या देण्यात आल्या.यावेळी नेताजी तरुण मंडळाच्या वतीने युवा उद्योजक सत्यजित जाधव यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेलच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments