“चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत पीटीएमचा उपांत्य फेरीत प्रवेश”
कोल्हापूर/प्रतिनिधी : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील शेवटचा सामना आज पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम) विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात टाय ब्रेकरवर पीटीएमने खंडोबाचा ५-३ पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याची सुरुवात विक्रम जरग, अजय इंगवले, राजेंद्र ठोंबरे, सचिन पाटील, अजिंक्य चव्हाण, प्रशांत गवळी, शरद जाधव, संजय पायमल, रवी कारीकर, सुनील पाटील, अक्षय पाटील, धोंडीराम कांबळे, सुरज मोरे, विकास पायमल, शिवाजी पवार, सुधीर यादव, जयाजी घोरपडे, सुमित जाधव, प्रकाश पाटील, संदीप सरनाईक, भाऊ मकोटे, शेखर पवार, अमित जाधव, संपत जाधव, संजय शिंदे, आनंदराव पाटील, मंजीत माने, रत्नेश कोंडेकर, सचिन पाटील, शरद माळी, देवेंद्र नलवडे, रामदास भाले, संभाजी मांगोरे, आर.डी.पाटील, संजय शिंदे, दिलीप साळोखे, रत्नदीप कुंडले, विराज पाटील, रमेश घाटगे, अभिजीत वनीरे, संजय कांबळे, सचिन पाटील, सुनील ठोंबरे, अॅड. राजेंद्र किंकर, शशिकांत पोवार, राजेंद्र चव्हाण, महेश सावंत, शरद माने, महेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित झाली.
पीटीएम विरुद्ध खंडोबा सामन्यात पूर्वार्धात १५व्या मिनिटाला खंडोबाच्या चिझोबा यांने गोल केला. मध्यंत्तरापर्यंत खंडोबाने १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात मधील अतिरिक्त वेळेत पीटीएमच्या ओंकार जाधवने पेनल्टी किक वरती गोल करून, सामन्यात बरोबरी साधली. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिला. यामुळे सामन्याचा निकाल ट्राय ब्रेकर वर घेण्यात आला. टाय ब्रेकरवर पीटीएमने खंडोबाचा ५-३ पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओंकार जाधव यांची निवड झाली. महेंद्र चव्हाण, रणजीत इंगवले, संदीप साठे, युवा उद्योजक सत्यजित जाधव, दिपक चोरगे, आशिष पवार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.या सामन्याच्या वेळी महिला व पुरुष प्रेक्षकांच्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशराव गुरव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, बाळासाहेब नचिते, गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, आशिष पवार यांच्या हस्ते भाग्यवान प्रेक्षकांची कुपन काढण्यात आली. हर्षदा बाजीराव पाटील ( मंगळवार पेठ), शिवतेज तानाजी चिले ( गजानन महाराज नगर) यांना गिफ्ट कुपन देण्यात आले.