प्रवासी रिक्षांची गॅस टाकी तपासणी संशयास्पद – कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा चालक व असंघटित क्षेत्र कामगार संघ
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आसनी प्रवासी रिक्षांमध्ये एलपीजी गॅस टाकी तपासणीसाठी शेकडो रूपये घेतले जातात. परंतु, त्याची तपासणी संशोयस्पद आहे. याविषयी कॉमन मॅन रिक्षा संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेवून निवेदन सादर केले.प्रवासी रिक्षांमध्ये असणारी गॅस टाकी ही ५ वर्षानंतर आरटीओ ने नेमून दिलेल्या एजन्सीकडून तपासणी करून घेतली जाते. या साठी एवढी रू१५००/- ते रू.२३००/- इतकी फी घेतली जाते. परंतु, सदरच्या टाकी तपासणी व्यवस्थित होत नाही. तसेच नेमून दिलेल्या एजन्सीकडे या कामासंदर्भातील ट्रेड सर्टिफिकेट नाही.
त्यामुळे या टाक्यांची तपासणी संशयास्पद आहे. सर्वसामान्य जनतेच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.म्हणून आज कॉमन मॅन रिक्षा संघटनेने, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन सादर केले व तपासणी यंत्रणेची प्रक्रिया तपासावी व गॅस टाकीची तपासणी ही शासनाने नेमून दिलेल्या पध्दतीने होते आहे किंवा नाही अशी मागणी केलीयावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी येत्या २ दिवसांमध्ये याची खातरजमा केली जाईलअसे कॉमन मॅन रिक्षा संघटनेला आश्वासित केले. आजच्या शिष्टमंडळात सुभाष शेटे, ईश्वर चेनी, जाफर मुजावर, नरेंद्र पाटील, अरूण घोरपडेभिकाजी मंडलिक, सरफुद्दीन शेख, मोहन बागडी, अविनाश दिंडे उपस्थित होते.