“चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत शिवाजी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश”
कोल्हापूर/प्रतिनिधी : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना आज शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात शिवाजी संघाने संयुक्त जुना बुधवार पेठचा ३-० ने पराभव करून, उपांत्य फेरीत प्रवेश केला.श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याची सुरुवात शिवराज नाईकवडे, अनिल पाटील, किरण दरवान, रणजीत आयरेकर, सुरेश पाटील, संजय कुराडे, संपत पाटील-चव्हाण, सुहास सळोखे, संजय पडवळे, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.एम पाटील, सुनील काटकर, संग्राम शिंदे, सुशील भांदिगरे, महेश कदम, अभिजीत खतकर, विराज चिखलीकर, महेश पाटील, राहुल बंदोडे, धनाजी आमते, सुजय पोतदार, प्रवीण लिमकर, अमर सासणे, निखिल कोराणे, शशिकांत नलवडे, संदीप भोसले, नितीन जाधव नाना यांच्या प्रमुख उपस्थित झाली.यावेळी मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, लंडन येथील प्रोफेसर एड्रीन मायर यांच्या कन्या कॅमेला व जावई जेम्स, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला बक्षीस देण्यात आलेशिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात १२ व्या मिनिटाला शिवाजी संघाच्या विक्रम शिंदे यांने गोल केला. मध्यंत्तरापर्यंत शिवाजी संघाने १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात शिवाजी संघाच्या रोहन अडनाईक याने ७८ व्या मिनीटाला तर संदेश कासार याने अतिरिक्त वेळेत गोल केला. पूर्णवेळेत शिवाजी संघाने संयुक्त जुना बुधवार पेठचा ३-० ने पराभव करून, उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ऋतुराज सूर्यवंशी यांची निवड झाली. या सामन्याच्या वेळी महिला व पुरुष प्रेक्षकांच्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. शिवराज नाईकवडी धनाजी सूर्यवंशी व विजय सावंत यांच्या हस्ते भाग्यवान प्रेक्षकांची कुपन काढण्यात आली. भक्ती बिरंनगडी ( राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू) यांना गिफ्ट कुपन देण्यात आले.राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांचे दुःखद निधन झाले आहे. सामना सुरू होण्यापूर्वी त्यांना संयोजक, फुटबॉल संघ व क्रीडाप्रेमींच्या वतीने श्रद्धांजली वाहिन्यात आली.