सतरा वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी कोल्हापूरात
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने रविवार दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी सतरा वर्षाखालील मुला मुलींची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत.रविवारी सकाळी दहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील १ जानेवारी २००६ ला किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलामुलींना भाग घेता येईल.
या निवड स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड १४ ते १६ एप्रिल २०२३ दरम्यान बुलढाणा येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सतरा वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़.
निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रुपये १०० प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी शनिवार दिनांक ८ एप्रिल ला रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे
श्री. भरत चौगुले – ७६२००६७२५१,
मनीष मारुलकर – ९९२२९६५१७३,
उत्कर्ष लोमटे – ९९२३०५८१४९,
प्रितम घोडके – ८२०८६५०३८८,
रोहित पोळ – ९६५७३३३९२६
आदीकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.