Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याघोडावत पॉलीटेक्निक-एम एस बी टी इ प्रोजेक्ट स्पर्धेत रायगड प्रथम तर कोल्हापूर-पंढरपूर...

घोडावत पॉलीटेक्निक-एम एस बी टी इ प्रोजेक्ट स्पर्धेत रायगड प्रथम तर कोल्हापूर-पंढरपूर द्वितीय

घोडावत पॉलीटेक्निक-एम एस बी टी इ प्रोजेक्ट स्पर्धेत रायगड प्रथम तर कोल्हापूर-पंढरपूर द्वितीय

जयसिंगपूर/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व आधुनिक कल्पनांना वाव देण्यासाठी संजय घोडावत पॉलिटेक्निक येथे एम एस बी टी इ २०२३ प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रायगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक भोरच्या संदेश गुरव आणि महादेव वेदपाठक यांनी प्रथम क्रमांक मिळून एक लाखाचे बक्षीस मिळवले. तर कोल्हापूर येथील गव्हर्मेंट पॉलिटेक्निकच्या अथर्व दिंडे, तेजस कावळे, पृथ्वी दुर्गुळे, विशाल पाटील आणि पंढरपूर कर्मयोगी पॉलिटेक्निक चे विशाल निंबाळकर, दिगंबर मडले, इम्रान शेख, तुषार देवकुळे,राहुल कोळी यांनी विभागून द्वितीय क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. स्पर्धेत ६४ हून अधिक पॉलिटेक्निक महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन जे ए एन जी एस टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीजचे संस्थापक एन. जे. पडते यांच्या हस्ते झाले. यावेळी आर बी टी पुणे चे उपसचिव एम.एस.उस्मानी, सहाय्यक सचिव श्रीमती ए.आर.कायगुडे, घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी,स्पर्धेचे समन्वयक एस.व्ही.चव्हाण, स्पर्धक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना एन जे पडते म्हणाले,की ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्यांच्या तांत्रिक कौशल्याला नक्कीच येथे संधी मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी परिश्रम घेतले त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होईल. ज्ञान,कौशल्य आणि सातत्य या गुणांना प्रोजेक्टमध्ये अत्यंत महत्त्व आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना भरारी देण्यासाठी अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रवीण छाया, ए.आर.कांबेकर, डॉ.सुहास देशमुख, प्रा.सुप्रिया दिवाण यांनी काम पाहिले. तर प्रा.नितीन पाटील प्रा. प्रशांत पाटील प्रा.रविंद्र धोंगडी प्रा. सुहास पाटील प्रा.योगेश पवार, प्र.विनायक पावटे, प्रा.शुभांगी महाडिक, प्रा.रहिसा मुल्ला, प्रा.वंदना शहा यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन नेहा पाटील हिने तर आभार सागर चव्हाण यांनी मानले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल विश्वस्त विनायक भोसले व चेअरमन संजय घोडावत यांनी प्राचार्य विराट गिरी यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments