भारती हॉस्पिटलच्या वतीने जोतिबा डोंगरावर मोफत आरोग्य तपासणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल, मंगळवार पेठ, कोल्हापूर यांच्या वतीने श्री क्षेत्र जोतिबा चैत्री यात्रेनिमित्त दिनांक ४ ते ६ एप्रिल २०२३ दरम्यान डोंगरावर येणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.भारती विद्यापीठाचे कार्यवाह तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम व भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. अस्मिताताई जगताप यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अभिनंदन मुके यांच्या मार्गदर्शनाखाली उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित शिंदे, कार्यालयीन अधीक्षक मिलिंद पाटील, डॉ. अगघा किणींगे, डॉ. नितीन कदम, डॉ. पल्लवी व्यवहारे , डॉ. खुशबू कुमावत, डॉ. अर्चना यादव, डॉ. अमेय पोकळे व डॉ. प्रणोती चिले हे वैद्यकीय अधिकारी, यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरात घेण्यात आलेल्या या तपासणी शिबिराचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला. श्वसन, हृदय विकार, पोटाचे विकार, मूळव्याध, मुतखडा, यकृत, त्वचा विकार, केस गळती, महिलांचे आजार, बालकांचे आजार आदी विविध प्रकारच्या आजारांची तपासणी करुन आरोग्य सुविधा व मार्गदर्शन देण्यात आले.