भाजप सरकारच्या हुकूमशाही विरोधात कोल्हापूर मधील काँग्रेसच्या वतीने उद्या रविवारी सत्याग्रह आंदोलन
कोल्हापूर/प्रतिनिधी : मा. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारकडून सुरू आहे त्या विरोधात उद्या रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, पापाची तिकटी, कोल्हापूर येथे सकाळी १०.३० वाजल्या पासून सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सुचनेनुसार व
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील (काँग्रेस गट नेते विधानपरिषद )
यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनात आमदार पी एन पाटील (सडोलीकर) आम. राजूबाबा जयवंत आवळे,आम. जयश्री चंद्रकांत आण्णा जाधव,आम. ऋतुराज संजय पाटील,आम. जयत आसगाऺवकर,सचिन प्रल्हाद चव्हाण
यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहर ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, इंटक संघटना, ओबीसी सेल अनुसूचित जाती विभाग अल्पसंख्यांक सेल असंघटित कामगार सेल सांस्कृतिक सेल, परिवहन सेल रोजगार स्वयंरोजगार सेल, अपंग सेल, माजी सैनिक संघटना, शिक्षक सेल, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.