क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी के. पी. खोत,गौतम परमार, सचिन ओसवाल उपाध्यक्ष
कोल्हापूर/प्रतिनिधी : क्रिडाई कोल्हापूरच्या सन २०२३-२०२५ या कालावधीसाठी नवीन मॅनेजिंग कमिटीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नगररचना विभाग व बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले त्रिमूर्ती डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर के. पी. खोत यांची तर उपाध्यक्षपदी सचिन ओसवाल व गौतम परमार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.क्रीडाई कोल्हापूरच्या जनरल सभेत सन २०२३-२०२५ सालाकरीता नवीन मॅनेजिंग कमिटीची निवड करण्यात आली होती. या कमिटीच्या झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली.
निवड झालेले अन्य पदाधिकारी व कार्यकरणी पुढील प्रमाणे :
अध्यक्ष के.पी. खोत (त्रिमूर्ती डेव्हलपर्स) ,
उपाध्यक्ष श्री.सचिन ओसवाल ( रामसिना कन्स्ट्रक्शन),
उपाध्यक्ष गौतम परमार( परमार इन्फ्रा),
सचिव संदीप मिरजकर ( गुरुबल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स),
खजानीस अजय डोईजड(शिवशक्ती डेव्हलपर्स),
सहसचिव श्री.गणेश सावंत(श्रीगणेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स),
सहसचिव श्री.सोमराज देशमुख(देशमुख डेव्हलपमेंट),
सहखजानीस श्री.सचिन परांजपे(स्वप्नशिल्प हौसिंग प्रा.ली.),
मॅनेजिंग कमिटी सदस्य खालील प्रमाणे श्री. विजय माणगावकर(निवारा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स),श्री.लक्समिकांत चोगुले(चोगुले होसमनी कन्स्ट्रक्शन), श्री.श्रीराम पाटील( श्रीराम बिल्डर्स ),श्री आदित्य बेडेकर(सिद्धांत इन्फ्रास्ट्रेचर),श्री.विश्वजित जाधव(कसबेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स), श्री.दीपक वाघुले(यश व्हेंचर), श्री.संदीप पोवार(मल्हार एंटरप्रायझेस),श्री. नंदकिशोर पाटील(अनंत डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा.ली.), श्री.अमोल देशपांडे(देशपांडे इन्फ्रा),या निवड सभेला निवडणूक अधिकारी महेश यादव आणि सुजय होसमणी उपस्थित होते.के पी खोत यांनी बोलताना माझ्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात क्रिडाई सभासदांच्या प्रश्नांनाबाबत मी जागरूकपने काम करेन असे सांगितले.यावेळी क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर व सचिव प्रदीप भारमल उपस्थित होते.