कोल्हापुरात हज यात्रा २०२३-२४ साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
कोल्हापूर : दि.१० फेब्रुवारी केंद्रीय हज कमिटी व महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या निर्देशानुसार कोल्हापुरात यंदा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी २०२३-२४ हज यात्रेचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवार दिनांक ११ फेब्रुवारीपासून कोल्हापुरातील दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग येथे सुरू करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा सुरू राहणार आहे.यावर्षी हज फाउंडेशन कोल्हापूर लिंब्रास फाउंडेशन कोल्हापूर व मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन संचलित इचलकरंजी हज कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हज यात्रेचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर , इचलकरंजी, आजरा, चंदगड गडहिंग्लज,शिरोळ-राजापूर, कागल,शाहूवाडी, पन्हाळा, जयसिंगपूर, पेठवडगाव,इचलकरंजी मलकापूर या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठीची सुविधा करण्यात आली आहे.यंदा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या यात्रेकरूंनी पासपोर्ट, आधार कार्ड, तीन पासपोर्ट साईज रंगीत फोटो,वारसाचे नाव दोन मोबाईल क्रमांक, अशा कागदपत्रांसह संपर्क साधावा असे आवाहन हाजी इकबाल देसाई, समीर मुजावर व सादिक जमादार यांनी केले आहे.