Wednesday, January 15, 2025
Home ताज्या रोटरी सनराईजतर्फे १९ जानेवारीला  कणेरी मठ येथे भटक्या कुत्र्यांची श्वान शाळा प्रकल्प...

रोटरी सनराईजतर्फे १९ जानेवारीला  कणेरी मठ येथे भटक्या कुत्र्यांची श्वान शाळा प्रकल्प व विविध प्रकल्पांचे होणार उद्घाटन

रोटरी सनराईजतर्फे १९ जानेवारीला  कणेरी मठ येथे भटक्या कुत्र्यांची श्वान शाळा प्रकल्प व विविध प्रकल्पांचे होणार उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज या सामाजिक संस्थेला २०२१-२०२२ या सालामध्ये २५ वर्ष पूर्ण झाले आहेत.रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज ही एक सामाजिक संस्था म्हणून कोल्हापूरमध्ये ओळखली जात असून या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये या संस्थेने आतापर्यंत अनेक विधायक कामे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत.व सध्याही अनेक उपक्रम राबविले जात आहेत.मागील वर्षी रोटरी वर्षी २०२१-२०२२ या कार्यकालमध्ये या सामाजिक संस्थेच्या कार्यकारिणीने विविध कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. त्याची पूर्तता या २०२३ वर्षांमध्ये होत आहे.यात १९ जानेवारीला कणेरी मठ येथे श्वान प्रकल्प उभारणी व सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो मॉनिटरिंग मशीन व मॅमोग्राफी युनिट आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला गेला आहे या सर्व उपक्रमांचा उदघाटन कार्यक्रम कणेरी मठ येथे होत आहे अशी माहिती सचिन मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भटक्या कुत्र्यांचा अलीकडे वावर अधिकच वाढत चालला आहे.यासाठी रोटरी सनराईज, चंद्रकांत हंजारीमलजी राठोड परिवार व कणेरी मठ यांच्या सामूहिक प्रयत्नातून कणेरी मठ येथे महाराष्ट्रातील पहिली अशी भटक्या कुत्र्यांसाठी श्वान शाळा प्रकल्प उभारण्यात आला आहे.यात एकूण ४०० भटक्या कुत्र्यांना आश्रय दिला जाणार आहे. व त्यांचे पालन पोषण केले जाणार आहे. असा हा एक वेगळा प्रकल्प या ठिकाणी सुरू केला जाणार असून त्या प्रकल्पासाठी एकूण ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.भारतात प्रथमच मोठ्या प्रमाणात श्वानाची शाळा रोटरीतर्फे उभारण्यात आली आहे. आणि पुढे भविष्यात गरज असल्यास शाळा वाढवून कुत्र्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सनराईज क्लब करणार आहे.
तसेच या ठिकाणी सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर साठी अद्ययावत असे मेंदूवरील जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी गरजेचे असलेले ६५ लाख रुपये किंमतीचे “न्यूरो मॉनिटरिंग मशीन” द रोटरी फाउंडेशन व मदाग्रास्कर रोटरी क्लब व रोटरी सनराइज कोल्हापूर यांच्या आर्थिक सहकार्यातून देण्यात येणार आहे.तसेच कॅन्सर तपासणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे “मॅमोग्राफी युनिट”प्रदान केले जाणार आहे. शिवाय पर्यावरण रक्षणासाठी व जलसंवर्धनासाठी रोटरी सनराईजने ६० लाख रुपये खर्च करून कणेरी मठ येथे तीन ठिकाणी अद्ययावत असे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले आहेत. जेणेकरून याचा उपयोग आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.असे विविध विकासात्मक उपक्रम रोटरी सनराईजने राबविले असून या सर्व उपक्रमांचे उदघाटन कणेरी मठ येथे १९ जानेवारीला सकाळी १० वाजता अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे.
रोटरी सनराईज या सामाजिक संस्थेमध्ये १२१ सभासद असून कसबा बावडा येथे या संस्थेची स्वतंत्र इमारत आहे.याठिकाणी संस्थेचे कामकाज चालते.या संस्थेच्या २५ व्या वर्ष पूर्तीनिमित पाच इंटरनॅशनल ग्लोबल ग्रँट प्रकल्प, सीएसआर फंडिंग मार्फत दोन सामाजिक उपक्रम, प्रकल्प व सभासदांच्या फंडातून पाच सामाजिक उपक्रम संस्थेने आतापर्यंत राबविलेले आहेत. त्यातील काही मोठे प्रकल्प सध्या क्लबच्या संकल्पनेतून पुढे आले असून त्याचे काम २०२१-२०२२ सालामध्ये सुरुवात झाली असून १८ रोजी पूर्ण होत आहे. संस्थेने जे काही स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आता पूर्ण होत असून या प्रकल्पांची पायाभरणी करून ज्यांच्यासाठी हे प्रकल्प राबविलेले आहेत. त्यांना ते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने उद्घाटन करून सुपूर्त केले जाणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यासाठी रोटरी सनराईजतर्फे माजी अध्यक्ष सचिन मालू व सचिव दिव्यराज वसा आणि इतर क्लबचे पदाधिकारी व सदस्य यामध्ये विक्रांत सिंह कदम, प्रसन्न देशिंगकर, राहुल.आर. कुलकर्णी, सचिन झंवर,राजूभाई परीख,चंद्रकांत राठोड, इंद्रजीत दळवी, डॉ. सचिन पाटील यांचे याला मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले आहे.
तर या उद्घाटन समारंभास सध्याचे अध्यक्ष ऋषिकेश खोत, व सचिव राहुल.एस. कुलकर्णी, यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या पायाभरणी व हस्तांतरण कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनल व रोटरी जिल्हा ३१७० तर्फे माजी प्रांतपाल गौरीश धोंड, विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे व भावी होणारे प्रांतपाल नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे व माजी सहाय्यक प्रांतपाल करुणाकर नायक व विद्यमान सहाय्यक प्रांतपाल सुभाष कुत्ते, डिस्ट्रिक्ट ऑफिसर अजय मेनन आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी दिली आहे.आणि सर्व गरजू जनतेने या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.यावेळी पत्रकार परिषदेला दिव्यराज वसा,विक्रांतसिह कदम,प्रसन्न देशिंगकर,राहुल.आर. कुलकर्णी,अध्यक्ष ऋषिकेश खोत,सचिव राहुल एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments