आरटीओ विभागामार्फत महामार्गावर चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा उभी रहावी यासाठी प्रयत्नशील राहणार – रोहित काटकर
कोल्हापूर, दि. १३ ( जिमाका) : फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताह दरम्यान नव्हे तर महामार्गावर वाहन चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा उप प्रादेशिक विभागामार्फत कार्यरत रहावी आणि पायलेट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूरमधून याचा प्रारंभ व्हावा ,अशी अपेक्षा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी व्यक्त केली .निमित्त होते रस्ता सुरक्षा अभियान मोहिमेचे कागल आरटीओ चेकपोस्ट येथे वाहन चालक – कार्यालयीन कर्मचारी स्थानिक ग्रामस्थांचे डोळे तपासणी शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय माहिती कार्यालयाचे उप संचालक डॉ. संभाजी खराट होते . या प्रसंगी श्री. काटकर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय ( कोल्हापूर ) तर्फे या सप्ताह निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली तर डॉ. खराट म्हणाले, वाहन चालवणे ही फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे. याकरिता व्यापक प्रबोधन व्हावे, यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करावे, असे आवाहन करुन कोल्हापूर आर टी ओ ने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले . यावेळी बोलताना संतोष कुलकर्णी यांनी समाजातील विविध घटकांसह प्रशासकीय विविध जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकांच्या आरोग्य तपासणी आणि इतर उपचारासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून वालावलकर हॉस्पिटल सदैव कार्यरत राहील, असे सांगितले.प्रारंभी उपस्थितांचे स्वागत विजयसिंह भोसले यांनी केले. यावेळी सहाय्यक संचालक (मा.) फारुक बागवान, विशाल बागडे, रोहन पांडकर, राहुल नलवडे, उदय केंबळे, वैभव तोरणे यांच्यासह इतर मोटर वाहन निरीक्षक तसेच डॉ. विरेंद्र वणकुद्रे, श्री पंत वालावलकर हॉस्पीटल, ( शिवाजी उधमनगर कोल्हापूर ) आरोग्य मित्र – शिबीर समन्वयक राजेंद्र मकोटे, अशोक माने, मनिषा रोटे, राहुल माने आदी मान्यवर उपस्थित होते .