Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याडॉल्बीचा ठेका, ढोल ताशांचा गजर अलोट भक्तांच्या गर्दीत गणेशाला निरोप

डॉल्बीचा ठेका, ढोल ताशांचा गजर अलोट भक्तांच्या गर्दीत गणेशाला निरोप

डॉल्बीचा ठेका, ढोल ताशांचा गजर अलोट भक्तांच्या गर्दीत गणेशाला निरोप

कोल्हापूर/प्रतिनिधी : ढोल ताशांचा गजर, झांज पथकांचा दणदणाट डॉल्बीचा ठेका,चंद्रा, मैं हू डॉन,पुष्पा चित्रपटातील गाणी या गाण्याचा तालावर थिरकत तरुणाईचा जल्लोष आणि गणेशाच्या मिरवणुकीतील वेगवेगळ्या आकर्षक गणेश मुर्त्या पाहण्यासाठी लोटलेला भक्तांचा जनसागर या अफाट अशा गर्दीच्या वातावरणात भक्तिमयपणे गणेशाला निरोप हा देण्यात आला. अनंत चतुर्दशी निमित्ताने तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या पूजनानंतर व गणेश मूर्तीच्या विसर्जनानंतर कोल्हापूर मधील गणेश विसर्जन मिरवणुकीला काल सुरुवात झाली. आणि तरुणाईचा जल्लोष उत्साह या मिरवणुकीमध्ये ओसंडून वाहताना पहावयास मिळाला. डॉल्बीचा दणदणाट, झांजपथकांचा गजर, अश्रुधुर, वेगवेगळ्या आकर्षक गणेश मुर्त्या, तरुणांचा वेगवेगळ्या गाण्यांवर नाच यामुळे कोल्हापूरची गणेश मिरवणूक ही उत्साही व आनंदी वातावरणात जल्लोषात ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर या दोन दिवसात पार पडली.
कोरोना नंतरच्या दोन वर्षाच्या वातावरणानंतर कोल्हापूर मधील गणेश चतुर्थी ही दहा दिवस घरोघरी व गणेश मंडळांनी उत्साही वातावरणात साजरा केली. या दहा दिवसांमध्ये विविध प्रकारचे देखावे गणेश मंडळांनी सादर केले. गणेशाला निरोप काल शुक्रवार हा दिवस होता. यावेळी पारंपरिक पद्धतीने ठरलेल्या मार्गावर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल,महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, पापाची तिकटी,गंगावेश मार्गे इराणी खण अशी निघाली व गणेशाचे विसर्जन इराणी खण येथे करण्यात आले. शहरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन मार्गावर पाहण्यासाठी दिवसभर पहाटे व दुसऱ्या दिवशी दहा सप्टेंबर रोजी लोकांनी गर्दी केली होती. या मार्गावर विद्युत रोषणाई अनेक मंडळांनी केली होती.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे स्वयंसेवी संघटनांचे बूथ हे लावण्यात आले होते. या बुथवर मंडळाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत श्रीफळ देऊन करण्यात येत होते. याचबरोबर इराणी खण संभाजीनगर या ठिकाणीही स्वागत बूथ उभे करण्यात आले होते. यामध्ये भाजप, महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जनसुराज्य पार्टी, स्वयंसेवी संघ,शिवसेनेचाही बूथ लावण्यात आला होता. त्या ठिकाणी सर्व गणेश मंडळाचे स्वागत श्रीफळ देऊन केले गेले. या गणेश विसर्जनमध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. महिलाही वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर, डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत होत्या. जल्लोष साजरा करत होत्या.

मोठा पोलीस बंदोबस्त

मिरवणूक मार्गावर सर्वत्र स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते, पोलीस, होमगार्ड मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. त्यामुळे विसर्जन मिरवणूक ही सुरळीतपणे पार पडली. पावसाचे सावट गेले दहा दिवस गणेशोत्सवावर होते. दहा दिवस पावसाचे होते. मिरवणुकीवर ही पावसाचे सावट होते. त्यामुळे गणेश मुर्त्या या दोन दिवस बाहेर पडत होत्या. विसर्जनासाठी बाहेर पडत होत्या.

महागणपतीची मिरवणूक निघाली शनिवारी

अनंत चतुर्थीदशीचा दिवस हा शुक्रवार ९ सप्टेंबर रोजीचा होता. मात्र तरुण मंडळांचा उत्साह व भव्य आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे कोल्हापूरची विसर्जन मिरवणूक ही गाजली.महागणपती शिवाजी चौक चा गणपतीची मूर्ती ही दुसऱ्या दिवशी मिरवणुकीतून इराणी खण येथे विसर्जित करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments