मनपा.नेहरुनगर शाळेत विद्यार्थी आलेत लंडन बसने नवागतांचे स्वागत
कोल्हापूर/प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा आज पहिला दिवस. पहिल्या दिवशी पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. मनपा.नेहरुनगर शाळेत दरवर्षी वेगळी थीम वापरुन नवागतांचे स्वागत केले जाते.यावेळी मुलांची आवडती बस म्हणजे लंडन बस या बसने शाळेत आलेल्या मुलांचे ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले..यावेळी १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला. नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.तसेच महानगरपालिका शाळास्तरावर राबविला जाणार असलेला मी इंग्रजी बोलणार व गणित झाले सोपे या उपक्रमांच्या हस्तपुस्तिकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद् घाटन करण्यात आले.यावेळी शिक्षक निरीक्षक मा.रवींद्र चौगले,प्रशासनाधिकारी मा.डी.सी.कुंभार,सामाजिक कार्यकर्ते व माजी सभागृह नेता मा.दिलीप भुर्के,माजी शिक्षण सभापती मा.पद्मजा भुर्के मॕडम ,व्यवस्थापन समिती सदस्य डाॕ.विनायक शिंदे,महेश सावंत,मुख्याध्यापक शहाजी घोरपडे सर्व शिक्षक ,सेवक,पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.