Sunday, December 22, 2024
Home ताज्या न्यू पॉलिटेक्निकमध्ये “इनोव्हेशन रिसर्च सेंटरला” केंद्र शासनाची मान्यता

न्यू पॉलिटेक्निकमध्ये “इनोव्हेशन रिसर्च सेंटरला” केंद्र शासनाची मान्यता

न्यू पॉलिटेक्निकमध्ये “इनोव्हेशन रिसर्च सेंटरला” केंद्र शासनाची मान्यता

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित न्यू पॉलिटेक्निक मध्ये भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे संशोधन (इनोव्हेशन रिसर्च सेंटर) केंद्रास मंजुरी देण्यात आली. १९८३ पासून तंत्रशिक्षणामध्ये अग्रेसर असणाऱ्या न्यू पॉलिटेक्निक ने गेल्या ३५ वर्षाहून अधिक काळात अनेक नामांकित उद्योजक घडविले आहेत तसेच राष्ट्रीय स्तरावरील डिपेक्स, थिंकक्वेस्ट अशा विविध प्रकल्प स्पर्धांमध्ये २५ पारीतोषिके व नुकत्याच संप्पन्न झालेल्या लोकराजा राजर्षि शाहू महाराज कृतज्ञता पर्वातील ‘ लोकराजा इनोव्हेशन आणि एक्सिबिशन २०२२ या स्पर्धेतील उल्लेखनीय यशामुळेच अशा प्रकारच्या संशोधन केंद्रास मान्यता मिळाल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन श्री. के. जी. पाटील यांनी केले.
या प्रसंगी न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ” उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांमधे नाविन्यपूर्ण प्रकल्प व संकल्पना जोपासण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने इनोव्हेशन सेलची स्थापना केली आहे. याचा प्राथमिक उद्देश युवा विध्यार्थ्यांना नवीन संकल्पनांसह संशोधन कार्य करण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर करणे हा आहे.”
विध्यार्थ्यांच्या कल्पनांचा आढावा घेऊन त्यासाठी प्री-इन्क्यूबेशन फंक्शनल इकोसिस्टिम स्थापित करण्याचे तंत्रज्ञान विध्यार्थ्यांसाठी अधिक चांगली संज्ञानात्मक क्षमता विकसित करणे, विविध नाविन्यपूर्ण आणि उद्योजगता संबंधित उपक्रमांचे आयोजन करणे, विध्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पना ओळखून गौरवासह यशोगाथा तयार करणे, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक यांच्यासमवेत सामायिक व नियमित कार्यशाळा, व्याख्यान, परिसंवाद आयोजित करून नवोदितांसाठी मार्गदर्शक दुवा तयार करणे, इनोव्हेशन पोर्टल तयार करणे, उद्योगांच्या सहभागासह आयडियाथॉन, हॅकथॉन, नवकल्पनांच्या बाबतीत विविध स्पर्धा व लघु-आव्हाने आयोजित करणे, अशी या संशोधन केंद्राची प्रमुख उद्दिष्टे असून प्रा. अश्विनकुमार व्हरामबळे हे या सेन्टरचे प्रेसिडेंट म्हणून काम बघतील अशी माहितीही प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी दिली. कोल्हापूर परिसरात असणाऱ्या शिरोली, गोकुळ शिरगाव सारख्या औद्योगिक वसाहती तसेच नवउद्योगपूरक वातावरण असल्यामुळे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ कोल्हापूरसह जिल्ह्यातील विध्यार्थ्यानी घ्यावा , असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. के. जी. पाटील, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, सर्व विभाग प्रमुख व न्यू पॉलिटेक्निकचा सर्व स्टाफ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments