‘सुपर स्टार सर्कस’ हाऊसफुल्ल कोल्हापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद
कोल्हापूर/प्रतिनिधी:कोल्हापुरात सुपर स्टार सर्कस आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी १ मे पासून दाखल झाली आहे.सर्कसचे रोज दुपारी एक, चार आणि सात वाजता असे तीन खेळ होत आहेत. नागाळा पार्कात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एस्तेर पॅटर्न हायस्कूलच्या मैदानावर पुढील ४० दिवस सर्कस राहणार आहे. पण या शनिवारी आणि रविवारी सर्कसचे सर्व खेळ हाऊसफुल्ल झाले.‘‘शाळांना सुटी पडली आहे. मुलांसह मोठ्यांचे मनोरंजन करण्यासाठी दोन वर्षांचा कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर पहिल्यांदाच सर्कस आली असल्याने कोल्हापूरच्या नागरिकांनी सर्कसला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सर्कसमध्ये दोन तास भरपूर मनोरंजनाचे खेळ आणि शारीरिक कसरती आहेत. नेपाळ, आसाम, बिहार, केरळ, महाराष्ट्रातील ७० कलाकार आहेत. दोन रशियन कलाकारांचाही सहभाग आहे. त्यामध्ये २५ महिला कलाकारांचा समावेश आहे. तर ५ विदूषकांच्या करामती आपल्याला पोट धरून हसायला लावत आहेत. २ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे यात विविध चित्तवेधक खेळ, अकर्षक नृत्ये, मौत का कुआ यांसह विविध आर्कषण या सर्कसमध्ये असल्याने तसेच सलग तीन दिवस सुट्टी असल्याने सर्कसला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.’तरी अजूनही महिनाभर सर्कस कोल्हापूर मध्ये आहे.तरी अशीच गर्दी करावी जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या सर्कसला यातून बाहेर काढता येईल असे आवाहन संयोजकांनी केले आहे.