Sunday, December 22, 2024
Home ताज्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब,रगेडियन आयोजित मरेथॉनला मिळाला भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब,रगेडियन आयोजित मरेथॉनला मिळाला भरघोस प्रतिसाद

क्रीडानगरीची कोल्हापूर रन उत्साहात

सदृढ कोल्हापूर – निरोगी कोल्हापूर ‘ ही ओळख जगात निर्माण होईल – जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आशावाद

कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब,रगेडियन आयोजित मरेथॉनला मिळाला भरघोस प्रतिसाद

दैनिक पुढारी असोसिएट पार्टनर

कोल्हापूर/ प्रतिनिधी : ऐन कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पहाटेच्या अंधारात आरोग्यासाठी हजारो आबालवृद्ध लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आरोग्यासाठी धावले निमित्त होतं कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब (केएससी) व रगेडियन आयोजित सहाव्या कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉनचे प्रतिवर्षीप्रमाणे मॅरेथॉनला याहीवर्षी भरघोस प्रतिसाद लाभला. देश विदेशातून आलेल्या सुमारे साडेतीन हजार स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. विविध अंतरांची मॅरेथॉन फत्ते करुन स्पर्धकांनी मेडल सर्टिफिकेट्स कोल्हापुरी फेटा परिधान करून देशाच्या तिरंगा ध्वजासोबत अभिमानाने सेल्फी काढला.
भावी पिढी सदृढ व्हावी या उद्देशाने करवीरनगरी कोल्हापुरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पेठा पेठांत तालीम परंपरा निर्माण करून ती विकसित केली.यापुढे जाऊन क्रीडा नगरीचा भक्कम पाया रोवला.पारंपरिक खेळा प्रमाणेच नव-नवीन खेळांना प्रोत्साहन दिले. लोकराजाच्या या लोकोपयोगी कार्याचा वारसा जपावा, लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्येक “कोल्हापूर फिट व्हावा” या उद्देशाने कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब व रगेडियन क्लब तर्फे कोल्हापूर मॅरेथॉनचे आयोजन केले जाते.याला दैनिक पुढारीचे भक्कम पाठबळ असते.
प्रतिवर्षाप्रमाणे मॅरेथॉन ची सुरुवात आज रविवारी पहाटे पोलिस कवायत मैदान पासून झाली जिल्हा प्रशासन , रगेडियन स्पोर्ट्स क्लब व कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने ‘ छ . शाहू स्मृती शताब्दीनिमित्त ‘अल्ट्रा रन ‘ मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पोलीस ग्राउंड येथे झेंडा दाखवून उद्घाटन केले .
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले , या स्पर्धेत सुमारे साडे तीन हजाराहून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून .या स्पर्धेद्वारे ‘सदृढ कोल्हापूर – निरोगी कोल्हापूर ‘ ही ओळख जगात निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करून, प्रत्येक कोल्हापूरकराने फिटनेसकडे लक्ष दयावे असा आशावाद व्यक्त केला.                                      यावेळी बोलताना कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी बोलताना कोल्हापूर साठी आम्ही आयोजित करत असलेल्या या मॅरेथॉनच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धक पोहोचतील अशी आम्हाला आशा आहे.ज्यामुळे कोल्हापूरचे नाव आणखी मोठे होईल असे बोलून दाखविले.                                         याचबरोबर रगेडियनचे आकाश कोरगावकर यांनी कोल्हापूर ही कलेची नगरी आहे या नगरीत खेळाला प्रोत्साहन नेहमीच मिळते मात्र ही सिटी फिट सीटी व्हावी यासाठी आम्ही सात वर्षांपूर्वी मॅरेथॉन ची संकल्पना पुढे आणली आणि आता याला भारत देशातून आणि विदेशातूनही स्पर्धकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळेच यातून स्पर्धक नव्या उमेदीने बाहेर पडतात याचा आम्हाला आनंद आहे.या मरेथॉनच्या माध्यमातून आम्ही स्पर्धकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकलो.यासाठी आम्हाला ज्यांच्याकडून सहकार्य मिळते त्या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे असे सांगितले.         यावेळी उर्वरित वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या रनला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार,कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे मार्गदर्शक विश्वविजय खानविलकर,कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण , कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर, रगेड क्लबचे आकाश कोरगावकर, आशिष तंबाके, आदित्य शिंदे, एस. आर.पाटील,डॉ. प्रदीप पाटील, महेश शेळके, राज कोरगावकर, सिद्धार्थ बंनसल, हिराकांत पाटील, गोरख माळी डॉ.विजय कुलकर्णी आदी सह उद्योजक उपस्थित होते.

मान्यवरही धावले

यामध्ये मॅरेथॉनमध्ये उपस्थित स्पर्धकांचा उत्साह पाहून मान्यवरांनाही रहावले नाही.तेही आबालवृद्धांसह मोठ्या उत्साहात धावले.

विविध संस्था संघटनांचा सहभाग

स्पर्धेचे मुख्य प्रायोजक हे वायु डाइनटेक अँप व एस. जे.आर टायर हे आहेत तर दैनिक पुढारी हे स्पर्धेचे असोसिएट पार्टनर आहेत. आणि सहप्रायोजक हे
ब्लोमिंग बड्स पब्लिक स्कुल,एचपी हॉस्पिटँलिटी,इंडो काउंट इंडरस्ट्रीज लि,माख,रेमण्ड लक्झरी कॉटन,डीकॅथलॉन, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर टूरिझम, जे.के.ग्रुप,आयनॉक्स,धनश्री पब्लिसिटी आदी आहेत.तर टोमॅटो एफ. एम. रेडिओ पार्टनर आहेत आणि बी. न्युज मीडिया पार्टनर आदी होते.
विगब्योअर स्कूल,अशोकराव माने महाविद्यालय, डी. वाय. पी.तळसंदे कॉलेज स्कूल, नरके स्कुल पन्हाळा, संजीवन पन्हाळा, संजीवन कदमवाडी,सेंट झेवियर्स स्कूल,माईसाहेब बावडेकर स्कुल,फोर्ट इंटरनॅशनल स्कूल यांनी सहकार्य केले होते.तर सिद्धिविनायक नर्सिंग होम व डी.वाय. पाटील,एज्युकेशनल सोसायटी यांनी मेडिकल हेल्थसाठी सहकार्य केले.व त्यांच्या चार अँबुलन्स स्पर्धेच्या ठिकाणी सेवा दिली.

आबालवृद्धांचा सहभाग

शाहूनगरी कोल्हापूरला असणाऱ्या क्रीडा क्षेत्राच्या प्रदीर्घ परंपरेमुळे हे शहर फिट सिटी म्हणून नावारूपाला आले आहे. पारंपरिक खेळापासून ते अत्याधुनिक साहसी खेळांमध्ये इथल्या खेळाडूंनी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत दबदबा निर्माण केला आहे. या क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये खेळाडूंबरोबर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी स्त्री-पुरुष,युवक युवती, ज्येष्ठ नागरिकांसह, नोकरदार, उद्योजक, राजकारणी, वकील, डॉक्टर यासह प्रत्येक घटकातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
देशभरातील विविध राज्यांत व परदेशातील अबालवृद्ध स्पर्धकांनी सहकुटुंब व मित्रपरिवारासह मॅरेथॉन पूर्ण केली.

दोनशे स्वयंसेवकांसह विविध समित्या

आयोजनासाठी दोनशे स्वयंसेवकांसह विविध समित्या सक्रिय होत्या. कोल्हापूर पोलीस दल, शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर महानगरपालिका, यांच्यासह विविध सेवाभावी संस्था संघटनांनी कोल्हापूर रन यशस्वी करण्यात सहभाग दिला.

मॅरेथॉनचे अंतर व मार्ग

कोल्हापूर रन मॅरेथॉन ५ – कि. मी,१० – कि. मी,२१- कि. मी,४२- कि. मी,व ५०- कि. मी असे पाच गटात स्पर्धा झाली.तर वयोगट हे १८ वर्षाच्या आतील पुढे १८ ते ३४,३५ ते ५०,५१ ते ६५ व पुढे ६५ वर्षावरील सर्व महिला व पुरुष गट असे होते. ५० किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड येथे पहाटे ३ वाजता सुरू झाली. ती अंबाबाई मंदिर पुन्हा पोलीस ग्राऊंड येथे येऊन पुन्हा एअरपोर्ट दोन राउंड अशा अंतरावर झाली.४२ किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड येथे सुरू होऊन ती एअरपोर्ट ला दोन राउंड अशी पूर्ण झाली.ही स्पर्धा चार वाजता सुरू झाली.२१ किलोमीटरची स्पर्धा ही सकाळी ६ वाजता पोलीस ग्राऊंड येथे सुरू झाली ती एयरपोर्ट आणि पुन्हा पोलीस ग्राउंड अशी झाली.
१० किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड येथे सकाळी ६.१५ ला सुरू होऊन ती केएसबीपी चौक आणि पुन्हा पोलीस ग्राऊंड अशी झाली.
५ किलोमीटर स्पर्धा पोलीस ग्राऊंड वरून सकाळी ६.३० वाजता सुरू होऊन ती कावळा नाका आणि पुन्हा पोलीस ग्राऊंड अशी झाली. मॅरेथॉनच्या मार्गावर दुतर्फा क्रीडाप्रेमी नागरिक स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. टाळ्यांच्या-शिट्याच्या गजरात ते खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. आपल्या गटाचे अंतर पार केल्यानंतर फिनिशिंग लाइन क्रॉस करताना प्रत्येक स्पर्धक जग जिंकल्याच्या आवेशात आपला आनंद साजरा करत होता. इतकेच नव्हे तर मेडल व प्रमाणपत्र घेतल्यानंतर सेल्फी पॉइंटवर स्वाभिमानाने सेल्फी काढत होता. पहाटे तीन वाजता सुरू झालेल्या या मॅरेथॉनचा थरार हा सुमारे आठ तासांनी म्हणजे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संपला.

सिल्की पॉइंटवर गर्दी

सेल्फी पॉइंट वर फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली होती. स्पर्धा पूर्ण करून येणारे सहभागी मेडल व सर्टिफिकेट घेऊन या सेल्फी पॉइंटवर गर्दी करीत होते. कोल्हापुरातील ऐतिहासिक वैभव असणाऱ्या जुना राजवाडा, आंबाबाई मंदिर,शिवाजी विद्यापीठ आदींचे फलक असणाऱ्या ठिकाणी सेल्फी काढण्यात आले. सिंहासनही लक्षवेधी ठरला.

मर्दानी कलेची प्रात्यक्षिके

ढोल ताशा दानपट्टा तलवार बाजी त्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली त्यांना सहभागी स्पर्धकांनी दाद दिली. पोलिस कवायत मैदान वरील गॅलरी साऊंड सिस्टिममध्ये वाजणाऱ्या गाण्यांवर सहभागी स्पर्धकांनी ठेका धरला.

फलाहार व नाश्ता

पोलिस कवायत मैदानावर येणाऱ्या सर्व स्पर्धकांसाठी फलाहारची व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याचे पाणी, केळी,लस्सी, सॅंडविच आधी भरपेट नाश्ता याठिकाणी पुरवण्यात आला.तसेच स्पर्धा मार्गावरही ठीकठिकाणी पिण्याचे पाणी व फळे देण्यात आली. हलगी बँड तिरंगा ध्वज ते कोल्हापुरी फेटा मॅरेथॉनमध्ये सहभागी पैकी काहीजण तिरंगा ध्वज घेऊन धावले तर काही स्पर्धक स्पर्धा पूर्ण केल्यानंतर कोल्हापुरी फेटा घालून फोटो घेतले तिरंगा ध्वज अनेकांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments