Monday, December 23, 2024
Home ताज्या उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक...

उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन  

उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

नांदणी/प्रतिनिधी : नांदणी (ता.शिरोळ) येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश बेकरीचे संस्थापक उद्योगपती श्री. आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस गुरुवार उद्या (दि.२४ मार्च) रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गतिमंद मुलांना दत्तक घेणे यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
चकोते ग्रुपच्या माध्यामातून उद्योगपती श्री. आण्णासाहेब चकोते यांनी प्रयत्नांची शिकस्त व नावीन्याचा ध्यास, दुरदृष्टी या त्रिसुत्रीच्या बळावर उद्योग, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात चकोते ग्रुपने भरारी घेतली आहे. याबरोबरच वाढदिवस हा फक्त निमित्त ठेवून सामाजिक कार्याला बळ देण्याचा विडा उचचला आहे. यातून एकाच दिवशी ३५० बसस्थानकांची स्वच्छता व रंगकाम करून एक यशस्वी पाऊल उचलले होते. यांची दखल घेवून लिमका बुक ऑफ रेकॉडमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेली पंधरा वर्षे रक्तदान शिबिरात रक्तदानाला मोठे पाठबळ मिळाले. व गतवर्षी कोरोना महामारीत काळाची गरज ओळखून आण्णासाहेब चकोते यांनी रक्तदानाचे आवाहन केले आणि त्यांच्या हाकेला प्रतिसाद देवुन या महारक्तदान शिबिरात तब्बल २०२५ जणांनी एकाच वेळी रक्तदान केले होते. याबरोबरच गतीमंद मुलांना दत्तक घेणे, महापूर काळात पुरग्रस्तांना मदतकार्य करुन त्यांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा, दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेवून त्याठिकाणी चारा व पाण्याची व्यवस्था करुन एक विधायक पाऊल उचलले आहे. तसेच कोरोना काळातही गरीब नागरीकांनाही मदतीचा हात देवून पाठबळ दिले आहे. शिवाय आरोग्य शिबिर व वृक्षारोपन यासह विविध कार्यक्रम समाजउपयोगी ठरत आहेत. तर शैक्षणिक व वैचारीक प्रगतीसाठी
नांदणी येथे सर्वसोयीनियुक्त नवजीवन नगरवाचनालय व एबीसी स्कुलची निर्मिती करुन समाजापुढे चकोते यांनी आदर्श निर्माण केला आहे.तर उद्याच्या २४ मार्च २०२२ च्या साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त नांदणी येथे भाजीपाला संघ व नवजीवन नगर वाचलानय येथे रक्तदान शिबिर, वृक्षारोपन, गतिमान मुलांना दत्तक घेणे यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर कामगाराच्या उपस्थिती उद्योगपती श्री. आण्णासाहेब चकोते यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर सायकांळी धरणगुत्ती येथील फॉर्म हाऊसवर सर्वाच्या शुभेच्छा घेण्यासाठी श्री चकोते उपस्थित असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments