Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्याउत्साह कोरोनानंतरच्या  दीपावलीचा

उत्साह कोरोनानंतरच्या  दीपावलीचा

उत्साह कोरोनानंतरच्या  दीपावलीचा

कोल्हापूर/श्रध्दा जोगळेकर : कोरोनाच्या कालावधीत मागील एक वर्ष दीपावलीचा सण आणि इतरही सण हे लोकांना साजरे करता आले नाहीत. यावर्षी मात्र जल्लोषात दीपावलीचा सण हा लोकांनी साजरा केला. कोरोनामुळे गेली दोन वर्ष लोकांच्या चेहऱ्यावर नाराजी आहे आर्थिक घडी विस्कटलेली आहे मागील वर्षी २०२० साली कोणतेही सण लोकांना साजरे करता आले नाहीत त्यामुळे लोक नाराज होते या वर्षी मात्र गणेशोत्सवापासून सरकाने कोरोनवरील सर्व निर्बंध हटविल्याने लोक सण साजरे करू शकत आहेत. गणेशोत्सवानंतर दसरा साजरा केला गेला आणि आता दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दिवाळीचा सण हा जल्लोषी आनंदी वातावरणात साजरा केला जात आहे लोकांच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा आलेले पहावयास मिळाले. एकमेकांना शुभेच्छा देत हिंदू मुस्लिम बांधवांनी हा सण आनंदी वातावरणात साजरा केला
मागील वर्षी संपूर्ण जगभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने हाहाकार माजविला होता. जगामध्ये या कोरोनामुळे अशांतताही पसरली होती लोक भीतीच्या छायेखाली वावरत होते किती तर लोकांचा कोरोनाच्या या महामारी मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला अनेक किती जण एकमेकांना पोरके झाले आहेत. एकमेकांना शुभेच्छा देणे लांबच आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही लोकांना भेटता येत नव्हते आणि सणही साजरे करता येत नव्हते कोरोनाच्या आजारांमध्ये लोकांची आर्थिक विवंचना आणि आर्थिक चणचण मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे आणि ती कोरोनाच्या कालावधीमध्ये ही होती सध्या लोक या कोरोनाच्या आजारातून बाहेर पडून पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्येच गणेश उत्सव साजरा केला गेला दसरा सण साजरा केला गेला आणि आज झालेला दीपावलीचा सणही लोकांनी आनंदी वातावरणामध्ये जल्लोषात साजरा केला. यावेळी लोकांनी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने देवाला कोरोणाच्या महामारीचे संकट आमच्यावर पुन्हा आणू नकोस अशी प्रार्थना ही या दीपावली सणाच्या निमित्ताने केली गेली मागील वर्षी फटाके उडविण्यावर निर्बंध होते मात्र यावर्षी हे निर्बंध हटविले गेल्याने लोकांनी आर्थिक परिस्थिती नसताना ही आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी हा दीपावलीचा सण नेहमीप्रमाणे साजरा केला कोल्हापूर मध्ये तर जल्लोष दीपावलीचा साजरा केला गेला मागील वर्षी लोक आपल्या नातेवाईकांकडे ये-जा करू शकत नव्हते दिवाळी फराळ देऊ शकत नव्हते कारण कोरोना या संसर्गजन्य आजारांमध्ये एकमेकांच्या सानिध्यात जाण्यापासून निर्बंध घालण्यात आले होते आता कोरोनाची परिस्थिती लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने आटोक्यात आलेली आहे मात्र हे कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही नाही तरीही लोक कोरोनाच्या या अत्यंत विदारक अशा अनुभवातून बाहेर पडून दीपावलीचा सण साजरा करण्यावर भर देत आहेत त्यामुळेच हा दीपावलीचा सण जल्लोषात साजरा केला गेला खरेदीसाठी उडालेली झुंबड आपल्या आर्थिक परिस्थितीला साजेसे कपडे खरेदी करणे आपल्या ऐपतीप्रमाणे सन साजरा करणे आदी गोष्टींवर लोकांनी भर देऊन कमी का प्रमाणात असेना पण कोरोनाचे वातावरण बाजूला सारून गरिबातल्या गरीब सर्वसामान्य लोकांसह उच्चभ्रू लोकांनी हा दीपावलीचा सण आनंदाने साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments