जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी गिरीश खडके
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सत्ताधारी गटाचे गिरीश खडके विजय झाले. उपाध्यक्षपदी त्यांच्याच पॅनेलचे सुधीर चव्हाण निवडून आले आहेत. विरोधी पॅनेलचे संपत पवार यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्याच्या पॅनेलचे विजयकुमार ताटे- देशमुख विक्रमी मतांनी सचिवपदी विजयी झाले. लोकल ऑडिटरपदी संकेत सावर्डेकर, महिला प्रतिनिधी म्हणून तृप्ती नलवडे यांनी बाजी मारली. जिल्हा बार असोसिएशनच्या सन २०२१-२२ च्या कार्यकारणी निवडणुकीसाठी शनिवारी ३० रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत मतदान प्रक्रिया झाली. एकूण २५९९ सदस्यापैकी १५५२ जणांनी मतदान केले होते. एकूण मतदानाच्या 58% इतके मतदान झालेले होते.