शिवसेना स्टाईलने कोल्हापूर कडकडीत बंदशहरातून दुचाकी रॅलीने केले बंदचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेती प्रधान भारत देशात शेतकऱ्यांची अमानुष हत्या केली जात आहे. केंद्र सरकारची चुकीची धोरणे आणि त्याविरोधात शेतकरी आंदोलन करत असतील तर त्यांना चिरडून मारण्या पर्यंतची मजल भाजपच्या नेत्यांची गेली असून, उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना आदरांजली वाहून, त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आणि आंदोलकांना चिरडून मारण्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या जिल्हा बंद मध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना स्टाईलने कोल्हापूर कडकडीट बंद करण्यात आला. शेतकरी हत्येचा निषेध नोंदवत शहरातून भव्य दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले.
शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथून या रॅलीची सुरवात शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो”, “मोदी सरकार हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले यांनी, केंद्र शासनाकडून घटनेची पायमल्ली होत आहे. शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिल्याचे सांगून जर त्याच्या शेतमालाच्या खरेदीची हमीच काढून घेतली जात आहे. सरकारच्या हमी भाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन व्यवस्था खिळखिळ्या करण्याच्या विरोधात आहे शेतकरी रस्त्यावर उतरत असून, शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनातील आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याचा मुलगा गाडी खाली चिरडून हत्याकांड करतो, ही भाजप सरकारची हिटलरशाही आहे. घडलेल्या शेतकरी हत्याकांडाचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.
यावेळी बोलताना युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांनी, घडलेला शेतकरी हत्याकांड निंदनीय असून, हल्लेखोर असणाऱ्या भाजप केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलावर कठोर कारवाई झाली पाहिजे. भाजप सरकारच्या काळात अच्छे दिन ऐवजी काळे दिवस जनतेस भोगायला लागत आहेत. शेतकऱ्यांची खुलेआम हत्या होत असताना केंद्र शासन आणि भाजपचे नेते एकप्रकारे हत्यारांना पाठीशी घालण्याचे कृत्य करत आहे. आजचा बंद हा शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आहे. देशातील शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याकरिता कोल्हापूर जिल्हा वासियांनी बंद मध्ये स्वयंस्फूर्तीने सह्भाग घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शिवसेना शहर कार्यकारणीच्यावतीने शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे शहरात बंदचे आवाहन करण्यात आली. शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथून सुरु झालेली रॅली जुना बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, गंगावेश, तटाकडील तालीम, शिवाजी पेठ, लाड चौक, मंगळवार पेठ मेन रोड, मिरजकर तिकटी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी मेन रोड, शाहूपुरी, फोर्ड कॉर्नर, बिंदू चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त करण्यात आली.
यावेळी माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी माजी नगरसेवक राजू हुंबे, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, उपशहरप्रमुख रमेश खाडे, सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे, दीपक चव्हाण, अमित चव्हाण, किशोर घाटगे, दीपक गौड, रणजीत जाधव, अजित गायकवाड, सुनील खोत, निलेश हंकारे, रियाज बागवान, सनी अतिग्रे, मंदार तपकिरे, सुशील भांदिगरे, कपिल सरनाईक, ओंकार परमणे, तन्वीर बेपारी, युवा सेनेचे योगेश चौगले, चेतन शिंदे, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, विश्वजित चव्हाण, शैलेश साळोखे, अक्षय कुंभार, दादू शिंदे, प्रसाद पोवार, अर्जुन आंबी, कपिल नाळे, उदय पोतदार, संतोष रेवणकर, आसिफ मुल्लाणी, साहिल मुल्लाणी, शैलेश कुंभार आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.