Sunday, January 12, 2025
Home ताज्या प्रकाशअण्णा, राग करू नका,कोणत्याही समस्येला थेट माझ्याशी संपर्क साधा - ग्रामविकास...

प्रकाशअण्णा, राग करू नका,कोणत्याही समस्येला थेट माझ्याशी संपर्क साधा – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

प्रकाशअण्णा, राग करू नका,कोणत्याही समस्येला थेट माझ्याशी संपर्क साधा –
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रकाशराव आवाडेअण्णा
राग करू नका कोणत्याही समस्येला थेट माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कोल्हापुरातील सीपीआरच्या धर्तीवर इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयातील सेवा लवकरच सुरू होतील, असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयाला मी आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी १५ मे २०२१ रोजी भेट दिली होती. त्यावेळी आम्ही दोन घोषणा केल्या होत्या. सिटीस्कॅन तात्काळ मंजूर करू आणि आयजीएम रुग्णालयाची दर्जोन्नती करून बेड वाढवून आयजीएम हे सीपीआरच्या धर्तीवर करू. त्यानंतर मुंबईला २४ मे २०२१ तारखेला जाऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बैठक घेऊन या बैठकीत तत्त्वतः मान्यता घेतली. रीतसर प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य विभाग व अर्थखात्याने तात्काळ मंजुरी देण्याचे मान्य केले. ५० बेड वाढ व सिटीस्कॅनचे टेंडर निघाले आहे. सहा निविदा धारकांनी प्रतिसाद दिला आहे. खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. सिटीस्कॅन आम्ही जेव्हा बसवू, त्यावेळी तेथील विधानसभेचे लोकप्रतिनिधी प्रकाशराव आवाडे यांना उपस्थित ठेवू.
पत्रकात पुढे म्हटले आहे, शासनाच्या या संपूर्ण प्रक्रियेत तातडीने एवढ्या दोन गोष्टी करणे आणि मान्यता मिळवून देणे. मला वाटतं अनेक वर्षे या शासनात काम केलेल्या प्रकाशराव आवाडे यांना किती वेळ लागतो आणि किती जलद हे काम झालं याची जाणीव झालीच असेल.
दरम्यान; लवकरच यंत्रमाग कामगारांचे महामंडळ काढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यंत्रमाग कामगारांच्या समस्यासाठी भाजपच्या काळात जी समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिलेला आहे. कामगार मंत्रीपदाची जबाबदारी माझ्याकडे येऊन अवघा एक महिना झालेला आहे. त्या समितीचा अहवाल पाहून यंत्रमाग धारकांचे महामंडळ करावं, अशी सातत्याने मागणी काँग्रेसचे नेते शशिकांत बावचकर व राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनी केलेली आहे. यंत्रमाग कामगारांचे महामंडळ स्थापन करण्याचा शासन लवकरच प्रयत्न करील.
आमदार प्रकाशराव आवाडे यांना माझी विनंती आहे, असे कोणतेही प्रश्न, समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधा. तात्काळ महाविकास आघाडी त्याला प्रतिसाद देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments