Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याआताच्या निवडणुकीतही सत्तारुढ आघाडीचीच सत्ता येईल, सत्तारुढ आघाडीला २२०० हून अधिक मतदान...

आताच्या निवडणुकीतही सत्तारुढ आघाडीचीच सत्ता येईल, सत्तारुढ आघाडीला २२०० हून अधिक मतदान होईल’ – माजी आमदार पी. एन. पाटील

आताच्या निवडणुकीतही सत्तारुढ आघाडीचीच सत्ता येईल, सत्तारुढ आघाडीला २२०० हून अधिक मतदान होईल’ – माजी आमदार पी. एन. पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी :  तीन दशकाहून अधिक काळ गोकुळचा कारभार अतिशय उत्तम आहे. महाराष्ट्र आणि देशातील हा उत्कृष्ट दूध संघ आहे. दूध उत्पादकांचा सत्तारुढ आघाडीवर विश्वास आहे. यामुळे आताच्या निवडणुकीतही सत्तारुढ आघाडीचीच सत्ता येईल, सत्तारुढ आघाडीला २२०० हून अधिक मतदान होईल’असा विश्वास आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.
पत्रकारांशी बोलताना आमदार पी. एन. पाटील म्हणाले,‘ गोकुळ दूध संघाने सर्वाधिक दूध दर दिला. लॉकडाऊनच्या कालावधीत अन्य दूध संघांनी १४ व १५ रुपयांना दूध खरेदी केली. मात्र गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांचे नुकसान होऊ दिले नाही. २७ रुपये या दराने दूध खरेदी केली. शेतकऱ्यांना न्याय दिला. दुधाला योग्य भाव देणारा गोकुळ दूध संघ आहे, ही शेतकऱ्यांची भावना आहे. एवढा चांगला संघ देशात दुसरा नाही. वर्षाला ८० ते ९० कोटी रुपये डिव्हींडट वाटप केले जाते.
गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादकांचा, व्यापारी कोण हे माहित नाही
पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तारुढ आघाडीवर टीका करताना व्यापाऱ्यांच्या ताब्यातील गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांच्या मालकीचा करणार असे वक्तव्य केले होते. पालकमंत्री पाटील यांच्या या टीकेचाही आमदार पी.एन. पाटील यांनी समाचार घेतला. आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळ दूध संघात कोण व्यापारी माहित नाही. हा संघ दूध उत्पादकांचा आहे. सतेज पाटील हे पूर्वी आमच्या पॅनेलसोबत होते. त्यांचा एक संचालकही होता. त्यावेळी त्यांना व्यापारी दिसले नाहीत का ? आताच कुठले व्यापारी आले ? केवळ राजकारणातून आरोप केले जात आहेत असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments