बिंदू चौक ते शाहू टॉकीज ते जयंती नाला या चॅनल टाकण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे उदघाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक २६ कॉमर्स कॉलेज येथे बिंदू चौक या ठिकाणी मंगळवार पेठ, बाराइमाम, अंबाबाई मंदिर परिसर, पापाची टिकटी परिसर, या ठिकाणावरून येणारे सांडपाणी ,पावसाचे पाणी हे बिंदू चौक येथून बागवान गल्ली, तडाखा तालीम, महात गल्ली भोई गल्ली मार्गे लक्ष्मीपुरी चौकात जमा होऊन नवीन चॅनल मधून लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉल ते जयंती नाला येथे या पाण्याचा निचरा होतो. पण हेच पाणी पावसाळ्यात बिंदू चौकात ओव्हरफ्लो होऊन बागवान गल्ली , महात गल्ली, येथे सांडपाणी रस्त्यावरून वाहून लोकांच्या घरात शिरते याकरिता महापौर सौ, निलोफर आश्कीन आजरेकर यांनी महानगरपालिका कोल्हापूर यांच्या फंडातून व प्रयत्नातून बिंदू चौक ते शाहू टॉकीज ते जयंती नाला हे चॅनल टाकण्याचं कामामुळे हे सर्व सांडपाणी आपल्या भागात न येता थेट जयंती नाल्यात मिसळणार आहे.हे काम चाळीस लाखाचे होते त्यापैकी यापूर्वी २० लाखाचे काम झाले आहे उर्वरित २० लाखाचे काम आज सोमवारी ३ मे रोजी सकाळी या कामाचे उद्घाटन मा. श्री जयेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर निलोफर आशकिन आजरेकर होते यांची प्रमुख उपस्थिती होती.त्याचबरोबर कार्यक्रमावेळी गणी आजरेकर, सदानंद दीगे, शौकत बागवान (तडाखा), समीर बागवान (KG) विनोद शिंदे, दस्तागिर बागवान, मोहसीन अन्वर बागवान (DB), हाजीअशपाक शिकलगार, राजू जमादार, शकील कोतवाल उपस्थित होते.