कोल्हापूर जिल्हा काँगेस कमिटीतर्फे लस घेणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा काँगेस कमिटीतर्फे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांना लस घेणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते हे पाण्याचे टँक जिल्हा काँग्रेस कमिटीला सुपूर्द करण्यात आले.
काँग्रेस पक्षाने आपल्या ध्येय धोरणानुसार सामान्यांना आधार देण्याचे कार्य नेहमीच केलं आहे. सध्या कोव्हीड लसीकरण मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. कोल्हापूर शहरात महापालिका क्षेत्रात १२ लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याला सुरुवात करण्यात आली. ही लसीकरण मोहीम पुढील सहा महिने चालणार आहे. लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामान्यांना आधार देण्याच्या भावनेतून कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने लसीकरण केंद्रावर १५० पिण्याच्या पाण्याचे टँक उपलब्ध करून दिले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते हे पाण्याचे टँक जिल्हा काँग्रेस कमिटीला सुपूर्द करण्यात आले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, किशोर खानविलकर, महंमद शेख, संपत पाटील, संध्या घोटने, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर, उजवला चौगले, मतीन शेख, सचिन काटकर, किरण मेथे, डॉ. बुलबुले, मंगल खुडे, आर.के. देवणे, यशवंत थोरवत, संजय चिकूर्डेकर, बाबुराव कंबळे, राजेंद्र मोरे, पार्थ मुंडे, दीपक थोरात, अक्षय शेळके आदी उपस्थित होते.