Friday, December 20, 2024
Home ताज्या महाराष्टात प्रथमच अद्ययावत क्यूविस जॉईंट रोबोटिक तंत्रज्ञान साईश्री हॉस्पिटल मध्ये

महाराष्टात प्रथमच अद्ययावत क्यूविस जॉईंट रोबोटिक तंत्रज्ञान साईश्री हॉस्पिटल मध्ये

महाराष्टात प्रथमच अद्ययावत क्यूविस जॉईंट रोबोटिक तंत्रज्ञान साईश्री हॉस्पिटल मध्ये

कोल्हापूर/ प्रतिनिधी- साई श्री हॉस्पिटल औंध पुणे येथे सुप्रसिद्ध जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ नीरज आडकर यांच्या नेतृत्वात पश्चिम भारतातील पहिल्याच क्यूविस जॉईंट रोबोटिक सिस्टीमची स्थापना करण्यात आली आहे.
साईश्री हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी हे नवीन तंत्रज्ञान वापरून पुण्यात पहिल्यांदा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केली. ६५ वर्षांच्या लीला देशमुख यांना उजव्या गुडघ्यात प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा सल्ला देण्यात आला. साईश्री हॉस्पिटल मधील डॉ नीरज आडकर आणि त्यांच्या टीमने त्यांच्यावर क्यूविस जॉईंट रोबोटिक सर्जरी केली. लीला यांच्या डाव्या गुडघ्याची काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. क्यूविस जॉईंट रोबोटिक तंत्रज्ञान वापरून शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांच्या उजव्या व डाव्या गुडघ्यातील शस्त्रक्रियेमध्ये कमालीचा बदल दिसून आला. या शस्त्रक्रियेच्या ४ तासातच त्या कोणत्याही वेदनेशिवाय चालू लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
साईश्री हॉस्पिटलच्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन च्या टीम ने डॉ नीरज आडकर यांच्या नेतृत्वात हे नवीन तंत्रज्ञान वापरून अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. साईश्री हॉस्पिटल सारख्या जॉईंट रिप्लेसमेंट मधील नामवंत हॉस्पिटल मध्ये अशा प्रकारचे जॉईंट रिप्लेसमेंट चे तंत्रज्ञान विकसित होणे म्हणजे ऑर्थोप्लास्टी क्षेत्रात नवीन क्रांती आली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
डॉ नीरज आडकर म्हणाले की, “क्यूविस जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही पारंपरिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी पेक्षा अधिक कार्यक्षम व अचूक असते. मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटत आहे की या तंत्रज्ञानाचा उपयोग आम्हाला ऑपरेशन थेटर मध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. केवळ एका महिन्याच्या कालावधीत आम्ही हे तंत्रज्ञान वापरून अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत व त्याचा फायदा रुग्णांना चांगल्या प्रकारे होत आहे.”
ते पुढे म्हणाले की, “या नवीन तंत्रज्ञानाने मानवी चुका होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे तसेच अचूक अलाइनमेंट बदललेल्या जॉईंट ला अधिक सक्षम बनवते. आमच्या हॉस्पटिल मधील हे तंत्रज्ञान अतिशय अद्ययावत आम्ही ते सामान्य मनासाठी परवडणारे ठेवले आहे जेणेकरून सर्वजण त्याचा लाभ घेऊ शकतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments