Thursday, December 19, 2024
Home ताज्या कागलमध्ये १००  बेडच्या अद्ययावत कोरोना हॉस्पिटलचे उद्घाटन - ग्रामविकास व कामगार मंत्री...

कागलमध्ये १००  बेडच्या अद्ययावत कोरोना हॉस्पिटलचे उद्घाटन – ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती

कागलमध्ये १००  बेडच्या अद्ययावत कोरोना हॉस्पिटलचे उद्घाटन – ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती

खबरदारी न घेतल्यामुळेच आली दुसरी लाट, तिसरी लाट रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचे केले आवाहन

कागल/प्रतिनिधी : योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली आणि सर्वत्र हाहाकार माजला आहे, अशी चिंता ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कागल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील १००  बेडच्या अद्ययावत कोरोना हॉस्पिटलच्या लोकार्पण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. आतातरी खबरदारी घ्या व कोरोनाची तिसरी लाट रोखा, असे आवाहनही त्यांनी केले.
येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात डॉ. अमर पाटील यांनी हे शंभर बेडचे अद्ययावत हॉस्पिटल सुरू केले.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण जगलाच पाहिजे व आनंदाने हसत मुखाने घरी गेला पाहिजे, या भावनेने सर्वांनी काम करा. संक्रमणाची गती मोठी आहे, त्यामुळे खबरदारी हाच एकमेव इलाज आहे.

चौकट…….
स्वतंत्र कक्ष व बेडची व्यवस्था…….
या हॉस्पिटलमध्ये शासनाने आखून दिलेल्या नियमावलीच्या निम्म्या दरात उपचार होणार आहेत.  एकूण १०० बेड आहेत. त्यामध्ये एच. आर. सिटी स्कोर २० पेक्षा जास्त असणाऱ्या रुग्णांसाठी गंभीर रुग्ण-  एक व्हेटीलेटर बेड,  उच्च दाब ऑक्सीजन मशीन बेड -दोन, ऑक्सीजन सह अतिदक्षता बेड- १५, एच. आर. सिटी स्कोर १२ ते २० असणाऱ्या रुग्णांसाठी सेमी आयसीयू बेड पुरूषासाठी  -१६ व सेमी आयसीयू बेड स्त्रियासाठी -१६. तसेच  एच. आर. सिटी स्कोर ० ते १२ असणाऱ्या रुग्णांसाठी जनरल वॉर्डमध्ये पुरुष बेड ‌-१६  व स्त्री बेड -१६ अशी विभागणी असणार आहे. ज्या रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट आलेला नाही त्यांच्यासाठी आठ बेडचा अलगीकरण कक्षही स्वतंत्र उभारला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता डी. व्ही. शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत नगरसेवक प्रविण काळबर यांनी केले. आभार डॉ. अमर पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments