Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यागोकुळ निवडणुकीत  विरोधी शेतकरी आघाडीसोबत राहणार: सत्यजित जाधव

गोकुळ निवडणुकीत  विरोधी शेतकरी आघाडीसोबत राहणार: सत्यजित जाधव

गोकुळ निवडणुकीत  विरोधी शेतकरी आघाडीसोबत राहणार: सत्यजित जाधव
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावे आणि  दूध उत्पादक शेतकऱ्याना  न्याय मिळावा, यासाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा सत्यजित जाधव यांनी केली. माजी आमदार दिनकरराव जाधव गटाच्या ठराव धारकांसोबत त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन हा निर्णय जाहीर केला.
 गोकुळच्या  निवडणुकीसाठी सत्यजित जाधव इच्छुक होते .पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी दोन्ही मंत्र्यांची आजरा दौऱ्यावेळी भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.
 ना. मुश्रीफ यांनी आजपर्यंत शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या जाधव गटाची ही भूमिका कौतुकास्पद आहे असे सांगितले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिनकरराव जाधव गटाचा पाठिंबा  आमच्या लढ्यास बळ देईल असे नमूद केले.यावेळी  विश्वजीत जाधव, सुरेश हवालदार, शहाजी देसाई, कुंडलिक तळकर, शिवाजी पाटील, नामदेव ठाकूर, पांडुरंग सुतार, गणेश रावळ विठ्ठल रेपे ,नंदकुमार जाधव, भीमराव डाकरे, श्रावण चव्हाण, धनाजी पाटील शिवाजी गुरव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments