प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी पथकाची नियुक्ती – जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश
कोल्हापूर/(जिल्हामाहिती कार्यालय) : प्रवाशी वाहतूककरणाऱ्या बसेसमधून प्रवासकरणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी वत्याअनुषंगाने सर्व कामाकाजकरण्यासाठी व नेमून दिलेल्या वाहनथांब्याच्या ठिकाणी तपासणीसाठीपथके तयार करण्यात आली आहेत.या पथकामध्ये एक वाहतूकदारसंघटनेचा प्रतिनिधी, प्रादेशिकपरिवहन कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, शासनाचे प्रतिनिधी वसंबंधित पोलीस ठाण्यातीलअधिकारी / कर्मचारी यांची नियुक्तीकरण्यात येत असल्याचे आदेशजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीनिर्गमित केले आहेत.
प्रवाशी वाहतुक करणाऱ्याखाजगी बसेसचे थांबे निश्चित करून,निश्चित केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतरठिकाणी प्रवासी उतरविण्यात येऊ नयेत.प्रवाशी उतरण्याच्या ठिकाणी CovidRAT (Rapid Antigen Test) टेस्टकरण्यासाठी मान्यताप्राप्त खाजगीप्रयोगशाळांची नेमणूक संघटनेने/वाहतुकदाराने करावी व त्याठिकाणीप्रत्येक प्रवाशाची Covid RAT (RapidAntigen Test) टेस्ट करण्यात यावी.त्याचा सर्व खर्च प्रवाशाने/वाहतूकदारानेकरावयाचा आहे, ज्या प्रवाशालाकोविड-१९ विषाणू लक्षणे आढळूनयेतील त्यांना संघटनेमार्फत/वाहतुकदारामार्फत त्वरीत नजिकच्या कोविड काळजी केंद्र येथे पाठविण्यातयावे. प्रवास करून आलेल्या व थांब्यावरउतरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या हातावरसंबधित बस कंपनी/वाहतूकदारव्यवस्थापकामार्फत १४ दिवस होमकॉरनटाईन असा शिक्का मारण्यातयावा. उल्लेखीत बाबींचे उल्लंघनकेल्यास आपत्ती व्यवस्थापनकायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाईकरण्यात येईल.