Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यारेमडेसिविर काळाबाजार प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला अटक

रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला अटक

रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला अटक

कोल्हापूर/प्रतिनिधी : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला गुरुवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीनं ताब्यात घेतले आहे. सागर सुतार असे त्याचे नाव आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु होता. यासंदर्भात माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मंगळवारी सापळा रचून दोघांना अटक केली होती. योगीराज वाघमारे,पराग पाटील अशी या संशियितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ११ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आली होती. यातील एक संशयित फरार होता याचा पोलिसांनी छडा लावत गुरुवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments