Thursday, December 26, 2024
Home ताज्या पदमा गादी कारखाना यांच्यावतीने महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी १० गाद्यांचा सेट

पदमा गादी कारखाना यांच्यावतीने महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी १० गाद्यांचा सेट

पदमा गादी कारखाना यांच्यावतीने महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी १० गाद्यांचा सेट

कोल्हापूर/प्रतिनिधी  : महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी गाद्या, उश्या, बेडशीट, पिलो कव्हर व चादर असा १० गाद्यांचा सेट महापालिकेकडे पदमा गादी कारखान्याचे मालक प्रकाश नारायण पाटील(मळगेकर) यांनी दिला. सदरचे साहित्य महापालिकेच्या कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे प्रकाश पाटील यांनी दिले. कोरोना आजाराच्यापार्श्वभूमीवर कोल्हापूरमहानगरपालिकेच्यावतीने युध्द पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याबाबत कोल्हापूरातील उद्योगपती, सामाजिक संस्था व नागरीकांस महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन पदमा गादी कारखाना यांनी १० गाद्यांचा सेट दिला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, निखील मोरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments