Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्या१ मे पासून मतदान केंद्रावर लसीकरणासाठी राज्य शासनाकडे परवानगीची मागणी

१ मे पासून मतदान केंद्रावर लसीकरणासाठी राज्य शासनाकडे परवानगीची मागणी

१ मे पासून मतदान केंद्रावर लसीकरणासाठी राज्य शासनाकडे परवानगीची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार १८ वर्षावरील सर्वांना १ मे पासून लस देण्यात येणार आहेत. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेच्या प्रभागवाईज मतदान केंद्रावर लसीकरण मोहिम सुरु करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
कोविड-१९ लसीकरण मोहिम दि.१६ जानेवारी २०२१ पासून आरोग्य कर्मचारी व फ्रंन्टलाईन वर्कर्संना पाहिल्या टप्यामध्ये लसीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्यामध्ये ६० वर्षावरील सर्व नागरीक तसेच ४५ ते ५९ वर्षातील व्याधीग्रस्त नागरीकांचे लसीरकरण सुरु करण्यात आले आहे. यानंतर तिसऱ्या टप्यामध्ये दि.१ एप्रिल २०२१ रोजीपासूनकोल्हापूर शहरामध्ये ४५ वर्षावरीलवयोगटातील नागरीकाना कोविड-१९ लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. राज्यामध्ये कोल्हापूर शहर व जिल्हा लसीकरणामध्ये आघाडीवर आहे. सध्याही लसीकरणासाठी नागरी आरोग्य केंद्र, पंचगंगा हॉस्पीटल, सावित्रीबाई फुले हॉस्पीटल व आयसोलेशन हॉस्पीटल येथे नागरीकांची प्रचंड गर्दी होत आहे. दि.१ मे पासून १८ वर्षावरील सर्वांनाच लस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. सध्याची परिस्थीती पाहता दि.१ मे नंतर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सोशल डिस्टंसींगचे पालन होण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे आहे. महापालिकेच्या प्रभागवाईज्‍ मतदान केंद्रावर लसीकरण मोहिम सुरु केल्यास गर्दी आटोक्यात येईल. असेही राज्य शासनाकडे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी  म्हंटले आहे. हा केलेला प्रस्ताव आजच शासनास सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments