गडहिंग्लज मध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
कोल्हापूर/प्रतिनिधी : गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळामध्ये रक्तपेढ्यांमध्ये रुग्णांना रक्ताची प्रचंड प्रमाणात टंचाई भासत आहे. रक्ताअभावी रुग्णांचा जीव जात आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पक्ष कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी वसंतराव यमगेकर, सुरेश कोळकी, महेश सलवादे, गुंडू पाटील, राजू जमादार, रश्मिराज देसाई, अमर मांगले, शर्मिला पोतदार, सिद्धार्थ बन्ने, रेश्मा कांबळे, उर्मिला जोशी, मंजूषा कदम, सुनिता नाईक, अरुणा कोलते, शबाना मकानदार, उज्वला कुंभार, शारदा आजरी, श्रेया कोणकेरी, स्वप्निल गुरव, बनश्री चौगुले, मनिषा तेली, डाँ. खोराटे, स रफिक पटेल,धनाजी कळेकर, चंदू मेवेकर, विक्रांत पोवार, अरुण शिंदे, राकेश पाटील, अमर चव्हाण, जयकुमार मुन्नोळे, महाबळेश्वर चौगुले, महेश गाढवी, शिवप्रसाद तेली, अरूण मिरजे, जयसिंगराव चव्हाण, तानाजी शेंडगे, रामजी नावलगी, लक्ष्मण तोडकर, रामाप्पा करीगार, सहदेव कोकाटे, किरण शिंदे, सतीश थोरात, राजेश पाटील, अभिजित पाटील, अवधूत रोटे व इतर मान्यवर उपस्थित होते.