Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यामिरजकर तिकटी येथे खरेदीसाठी आलेल्या व विनाकारण फिरणाऱ्यां ६ नागरीकांचे अहवाल पॉझिटिव्ह

मिरजकर तिकटी येथे खरेदीसाठी आलेल्या व विनाकारण फिरणाऱ्यां ६ नागरीकांचे अहवाल पॉझिटिव्ह

मिरजकर तिकटी येथे खरेदीसाठी आलेल्या व विनाकारण फिरणाऱ्यां ६ नागरीकांचे अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर/प्रतिनिधी : मिरजकर तिकटी येथे मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्टवेळी ६ नागरीकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरामध्ये संचारबंदी आहे परंतू अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरीक गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने मोबाईल्‍ व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. मिरजकर तिकटी येथे खरेदीसाठी आलेल्या व विनाकारण फिरणाऱ्यां ६ नागरीकांची मोबाईल्‍ व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये एकूण १४९ नागरीकांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये १४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ग्रामिण भागातून व शहरातून आलेले ६ नागरीकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पाचगांव येथील १ किणी वाठार येथील १ गुजरी परिसरातील २ शिवाजी पेठ परिसर २ नागरीकांचा समावेश आहे. दोन दिवसात मोबाईल्‍ व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट बिंदू चौक व लक्ष्मीपूरी येथे घेण्यात आली. यावेळी ७६ नागरीकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६ नागरीक पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व पॉझिटिव्ह नागरीकांना डीओटी सेंटरला व आज किणी वठार येथे सापडलेल्या नागरीकाला पारगांव येथील कोवीड सेंटरला ठेवण्यात आले आहे. तरी नागरीकांनी मास्कचा वापर व सॅनिटाईजरचा वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा अश्या गर्दीच्या ठिकाणी हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांनी गर्दी टाळावी व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलवडे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments