Sunday, December 22, 2024
Home ताज्या दलाई लामा फेलोशीपसाठी डॉ. सुबोध प्रभू यांची निवड

दलाई लामा फेलोशीपसाठी डॉ. सुबोध प्रभू यांची निवड

दलाई लामा फेलोशीपसाठी डॉ. सुबोध प्रभू यांची निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागात अॅडजंक्ट प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू शास्त्रज्ञ डॉ. सुबोध (शिवदत्त) प्रभू यांची प्रतिष्ठेच्या ‘दि दलाई लामा फेलो’ म्हणून निवड झाली आहे.
‘न्यूरोलॉजिकल को-रिलेट्स ऑफ बुद्धिस्ट फिलॉसॉफी’ या विषयावरील शास्त्रीय शोधप्रबंध ते वर्षभरात सादर करतील. त्याचप्रमाणे या विषयावर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ व तत्वज्ञांच्या समूहासमोर दोन सेमिनारही देतील.
डॉ. प्रभू यांना प्राप्त झालेल्या या फेलोशीपबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाच्या रकमेतून दरवर्षी आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी एका संशोधकाची फेलो म्हणून निवड केली जाते. यासाठी जगभरातून प्रस्ताव सादर करण्यात येत असतात.
कोल्हापुरातील ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांचे सहकारी म्हणून दशकाहून अधिक काळ रुग्णसेवा केल्यानंतर डॉ. सुबोध प्रभू यांनी फ्रान्समध्ये ग्रेनोबल येथे औषधांना दाद न देणाऱ्या आणि मेंदू शस्त्रक्रिया शक्य नसलेल्या फिट्स यांवर डी.बी.एस. या नाविन्यपूर्ण उपचार पद्धतीबाबत सहा वर्षे संशोधन केले. यासाठी त्यांना फेडरेशन ऑफ युरोपियन न्यूरो सायन्स सोसायटीज् (फॅन्स) यांची वैयक्तिक ग्रँट मिळाली होती.
भारतात परतल्यावर बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी‘बिहेविअल इकॉनॉमिक्स’ विषयाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम सुरू केले. तसेच फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्रेनोबल येथील ब्रेनटेक संस्थेत‘ट्रान्सलेशनल थेरपीज्’ विषयातील संशोधक विद्यार्थ्यांचे सह-मार्गदर्शक म्हणूनही ते काम पाहतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments