जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारी रक्तदान शिबिर
पालकमंत्री सतेज पाटील करणार रक्तदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सद्या कोल्हापूर जिल्ह्यातील रक्त पेढ्याकडे कमी प्रमाणात रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने सोमवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे . यावेळी . पालकमंत्री सतेज पाटील हे स्वतः रक्तदान करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिराला उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन सचिव संजय पोवार ( वाईकर) यांनी पत्रकाद्वारे केले
पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे . लसीकरण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला दोन महिने रक्तदान करता येत नाही. सध्या बरेचजण लस घेत असल्याने रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे रक्त पेढ्याकडे कमी प्रमाणात रक्तदान होत आहे. त्यामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या आठ दिवस पुरेल एवढाच रक्ताच्या पिशव्यांचा साठा उपलब्ध आहे. ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.