Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यासवादे गावाच्या विकासासाठी कटिबद्ध - आ. पृथ्वीराज चव्हाण

सवादे गावाच्या विकासासाठी कटिबद्ध – आ. पृथ्वीराज चव्हाण

सवादे गावाच्या विकासासाठी कटिबद्ध – आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : सवादे गावच्या विकासासाठी आजपर्यंत निधी दिला आहे. नूतन सरपंच व त्यांच्या सहकारी सदस्यांनी विकासकामांची यादी द्यावी. मी गावाच्या विकासासाठी आणखी विकासनिधी देईन व सवादेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. सवादे (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच लक्ष्मी सुतार व उपसरपंच पुजाराणी थोरात-पाटील यांच्यासह सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. चव्हाण यांच्या हस्ते सरपंच सुतार, उपसरपंच सौ. थोरात, सदस्य नितीन थोरात, मनिषा थोरात, सविता बांदेकर, जयश्री साठे, जयश्री कदम या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तर नितीन थोरात यांची कराड दक्षिण काॅंग्रेसच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सवादे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या ऐतिहासिक वळणावर जात असताना हनुमान प्रभाग क्रं. ३ मध्ये पती व पत्नीने अर्ज दाखल केल्यामुळे एका प्रभागासाठी निवडणूक झाली. ६ जागा बिनविरोध झाल्या होत्या. पती व पत्नीविरोधातील प्रभाग तीनमधील सर्व उमेदवार सर्वपक्षीय नेत्यांनी सुमारे ४०० मतांच्या फरकाने निवडून आणले.
पृथ्वीराज बाबांनी सवादे गावाला कायमच मोठा निधी दिला आहे व यामुळेच विकासदूत असणाऱ्या पृथ्वीराज बाबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय गावकऱ्यांनी केल्यामुळेच सवादे गावात काँग्रेस विचारांची सत्ता आली. पृथ्वीराजबाबा गटाच्या ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या लक्ष्मी सुतार यांची सरपंचपदी व उपसरपंचपदी पुजाराणी थोरात-पाटील यांची निवड झाली आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा आ. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाजीराव थोरात, लालासाहेब बांदेकर, आबासाहेब जंगम, दिपक थोरात, सुनिल थोरात, आनंदा थोरात, शिवाजी सुतार आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments