चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट तर्फे पाचव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे ३ दिवसीय व्हर्चुअल आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे १२ ते १४ मार्च २०२१ दरम्यान आयोजन
कोल्हापूर/ प्रतिनिधी : मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने पाचव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२१ चे आयोजन केले आहे. या परिषदेचा उद्देश मधुमेहाचा पराभव करण्यासाठी अद्ययावत संशोधन व ज्ञानासह आरोग्यसेवा देणाऱ्यांना सक्षम बनविणे हा आहे. उद्घाटन सोहळ्यास डॉ. सौम्या स्वामीनाथन आणि डॉ. व्ही. मोहन मुख्य पाहुणे व अतिथी म्हणून उपस्थीत असतील.
डॉ. सौम्या स्वामीनाथन या नुकत्याच डब्ल्यूएचओच्या उपक्रमांसाठी साठी उपसंचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांना क्लिनिकल केअर आणि संशोधनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे. तसेच डॉ. व्ही. मोहन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मधुमेह तज्ञ आणि वैज्ञानिक आहेत जे मधुमेह संशोधन, आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात ४० वर्षांपासून कार्यरत आहेत.
या परिषदेमध्ये रूग्णालयात रक्तातील साखरेचे नियंत्रण, मधुमेह व्यक्तींची काळजी, ग्लूकोजचे प्रमाण, डायबेटीस केअर मध्ये काही नवीन संशोधन, डायबेटीस हार्ट फेल्युअर, इंसुलिन पंप, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, आठवड्यातून एकदा इंजेक्शन्स, डायबेटीस व्यवस्थापना मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची भूमिका, मधुमेहाचे रिमोट मॉनिटरिंग, मधुमेह रुग्णांची काळजी घेणे या गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे.
यावेळी बोलताना चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे श्री लाल एल. चेलाराम म्हणाले की, “चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट नेहमीच मधुमेह आणि त्यामुळे होणारे विविध विकार टाळण्यासाठी आघाडीवर राहिली आहे. या परिषदेद्वारे मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे मधुमेह व त्यामुळे होणारे दुष्परिणाम या वरील उपचारांवर सकारात्मक प्रभाव पडेल.”
चेलाराम डायबिटीज संस्थेचे सी.ई.ओ. डॉ. उन्नीकृष्णन एजी, म्हणाले की, “ पाचव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदमध्ये जगभरातून आलेली तज्ञ मंडळी मधुमेह उपचार व काळजी यावर आपले अनुभव व ज्ञान सादर करतील. याचा फायदा भारतीय वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांना होईल व मधुमेहावर मात करण्यास मदत होईल.
यावेळी बोलताना चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.(ब्रि) अनिल पी पंडीत म्हणाले की, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट हे अत्याधुनिक सोई सुविधां बरोबर ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम, इन्सुलिन पंप, अॅक्सिडेंट इमर्जन्सी ,ऑर्थोपेडिक, न्युरोसर्जरी व नेत्ररोग यासह विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज आहे. चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट एकाच छताखाली सर्व सोयी सुविधा पुरवत असल्यामुळे मधुमेह आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी हे अग्रगण्य इन्स्टिट्यूट आहे.पाचवी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद- २०२१ ही वैद्यकीय क्षेत्रातील सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान याला जोडणारा एक दुवा ठरू शकेल. तसेच ही परिषद डॉक्टर व संशोधक यांना मधुमेहाच्या नवीन संशोधनांवर वर प्रकाश टाकण्यासाठी एक वैद्यकीय व्यासपीठ उपलब्ध करून देईल.