जीवन आवळे यांनी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या सह इतर आंदोलकांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली खोटी तक्रार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील ब्रह्मपुरी येथील बेकायदेशीर सुरू असलेले पँरीश हाँलच बांधकाम थांबवण्यासाठी आणि ख्रिस्ती बांधवा ना न्याय देण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने १ मार्चला सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले होते.यावेळी शिवसेनेची बदनामी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यान आंदोलकांनी कोणतेही दमदाटी ,धक्काबुक्की न करता विनंती करून जीवन आवळे यांना कार्यालय बाहेर काढल्यानंतर स्थानिक महिलांनी कार्यालयाला कुलूप लावले मात्र जीवन आवळे यांनी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या सह इतर आंदोलकांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली आहे तर ही खोटी तक्रार जीवन आवळे यांनी कोल्हापूर जिल्ह्याला लागलेल्या एका नेत्यांच्या सांगण्यावरुन आमच्यावर केल्याचा आरोप रविकिरण इंगवले यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.तर ख्रिस्ती बांधवांच्या न्याय हक्कासाठी झालेले हे आंदोलन शांततेत झाले असून जीवन आवळे यांनी दबाव टाकण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे फादर एस. एम. गोगटे यांनी सांगितले आहे.यावेळी पत्रकार परिषदेला स्थानिक महिला व शिव सैनिक उपस्थित होते.