Wednesday, February 5, 2025
spot_img
Homeताज्याआमदार ऋतुराज पाटील यांनी राज्यातील पहिल्या लायसन्स धारक महिला रिक्षाचालक दुधाणे यांच्या...

आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्यातील पहिल्या लायसन्स धारक महिला रिक्षाचालक दुधाणे यांच्या रिक्षातून मारला फेरफटका

आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्यातील पहिल्या लायसन्स धारक महिला रिक्षाचालक दुधाणे यांच्या रिक्षातून मारला फेरफटका

कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरातील श्रीमती रेखा दुधाणे काकी या महाराष्ट्रातील पहिल्या लायसन्स धारक रिक्षाचालक यांच्या रिक्षातून आज फेरफटका मारला . आ.पाटील यांना अधिवेशनासाठी मुंबईला जावे लागणार असल्याने उद्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची आज भेट घेऊन त्यांचा प्रवास जाणून घेतला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
गेली ३० वर्षे धैर्याने आणि चिकाटीने रिक्षाचालक म्हणून काम करताना दुधाणे यांनी परिस्थिला खंबीरपणे तोंड दिले . मुलांना शिक्षण दिले, संसाराला आकार तर दिलाच पण लोकांची सेवा करण्याचे व्रत जपले. रात्री अपरात्री पेशंट तसेच अडल्या नडल्या लोकांना त्या रिक्षाची सेवा देतात.बऱ्याच लोकांकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि त्यांचे या सर्वांशी कुटुंबीय नाते निर्माण झाल्याने सर्वजण हक्काने त्यांच्याशी संपर्क करतात. दुधाणे यांनी ३० वर्षापूर्वी निवडलेली वेगळी वाट आजही वेगळ्या क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात आ.पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments