छत्रपती शिवाजी महराजांचे आचार विचार व संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी – चेअरमन रविंद्र आपटे
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातचनाही तर संपूर्ण जगाला वेळोवेळी वेगवेगळ्यामाध्यमातून वैयक्तिक,सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये शिवचरित्र आणि शिव विचारच मार्गदर्शक ठरले आहेत. अशा शब्दात गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी शिवजयंती निमित्त संघाच्या ता.पार्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मत व्यक्त केले. संघाच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये व्हिडिओ क्लिपद्वारे आपण लवकरच सर्वांच्या भेटीला येत आहोत, असे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे आज शिवजयंती निमित्ताने त्यांनी गोकुळच्या कार्यालयीन कामकाजात भाग घेत आपण तंदुरुस्त आहोत याची झलक दाखवीली. गोकुळचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील त्यांचे जल्लोषात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्त जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिकसाहेब वचेअरमन रविंद्र आपटे यांनी शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पणकेला आणि सर्वांनी त्यांना वंदन केले.यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिकसाहेब,चेअरमन रविंद्र आपटे , माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके, रणजितसिंह पाटील, जेष्ठ संचालक विश्वास जाधव, संचालक दिपक पाटील, उदय पाटील, बाळासो खाडे, अमरिशसिंह घाटगे, सत्यजीत पाटील, विजय तथा बाबा देसाई, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी, एस. एम. पाटील,व्यवस्थापक प्रशासन डी.के.पाटील, जनसंपर्क अधिकारी पी.आर.पाटील, चेतन नरके, रघु पाटील व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.