भारतीय आयुर्विमा मंडळाचे विकासराव यांचे कागल कार्यालयात जोरदार स्वागत
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक विकासराव यांनी नुकतीच कागल येथील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. कागल येथील कार्यालयाने अवघ्या तीन महिन्यांमध्ये २६०० पॉलिसी व १ कोटी ८० लाख रूपये प्रीमियम आणला असून कोल्हापूर डिव्हिजन मध्ये कागल कार्यालयाने अव्वल स्थान घेतले आहे. शिवाय या कार्यालयाचे इन्चार्ज प्रशांत घाडगे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त २७६ पॉलिसी एकाच दिवशी करून सर्व विमा प्रतिनिधी व विकास अधिकारी यांना वाढदिवसाची भेट दिली आहे. कागल कार्यालय चालू झाल्यापासून शतकवीर,एम. डी .आर. टी असे अनेक कार्य अल्पावधीत केले आहेत. या सर्व कामाची दखल घेण्यासाठी व पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यासाठी सी विकास राव या कागल कार्यालयात आले होते. त्यांनी कागल कार्यालयांमधील सर्व कर्मचारी विमा प्रतिनिधी व विकास अधिकारी यांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कागल कार्यालयाकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यासाठी कागल कार्यालयाचे सर्व कर्मचारी, विमा प्रतिनिधी व विकास अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.