Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्यामोकातंर्गत कारवाई केलेल्या इचलकरंजी येथील गुंडास अटक

मोकातंर्गत कारवाई केलेल्या इचलकरंजी येथील गुंडास अटक

मोकातंर्गत कारवाई केलेल्या इचलकरंजी येथील गुंडास अटक

इचलकरंजी/प्रतिनिधी : मोकातंर्गत कारवाई केलेल्या इचलकरंजी येथील गुंड श्याम लाखे याच्या गँग मधील सुमारे तीन वर्षे फरारी असलेल्या गुंडास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. हरिकिशन नंदकिशोर पुरोहित (वय ३ ९, रा. राधाकृष्ण टॉकीज समोर, वृंदावन बिल्डींग इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली. पोलीस निरीक्षक सावंत म्हणाले, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी जिल्ह्यातील मोका अंतर्गत गुन्ह्यातील आणि अन्य गुन्ह्यामधील फरारी असलेल्या संशयीत आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याना आदेश दिला होता. याच दरम्यान महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदयातील (मोका) फरारी गुंड हरिकिशन पुरोहित हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज येथे येणार असल्याची माहिती समजली. त्यावरून एक पथक करून त्याला गुरुवारी ( ४ फेब्रुवारी) दुपारी रंगेहाथ पकडले. तो सुमारे ३ वर्षे फरारी होता.
ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, कॉन्स्टेबल असीफ कलायगर सुरेश पाटील, विनोद कांबळे, प्रदिप नाकिल व अमर वासुदेव यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments