Thursday, June 26, 2025
spot_img
Homeताज्याकोल्हापूर कॅन्सर सेन्टर तर्फे ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे...

कोल्हापूर कॅन्सर सेन्टर तर्फे ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर कॅन्सर सेन्टर तर्फे ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर कॅन्सर सेन्टर तर्फे ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांची मोफत कर्करोग तपासणी सोबत, जनजागृतीपर अनेक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सध्याची बदललेली जीवनशैली आणि व्यसनाधीनता यामुळे समाजात कॅन्सरचे प्रमाण देखील वाढत आहे यामध्ये सर्वात जास्त तोंडाचा कॅन्सर, दुसऱ्या स्थानावर स्तनांचा कॅन्सर आणि तिसऱ्या स्तनावर फुफ्फुसाचा कॅन्सरचा समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींची संख्या जास्त असल्याने, या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखूचे व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे तोंडाच्या कॅन्सरमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के रुग्ण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कॅन्सरग्रस्त होत असतात. अनेकवेळा कॅन्सरची लक्षण माहीत नसल्याने निदान होण्यास आणि उपचारास उशिर होतो. यासाठी कॅन्सर विषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि कोल्हापूर जिल्हा कॅन्सर मुक्त व्हावा यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. येत्या ४ फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनानिमित्त सेंटर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी यावेळी दिली. यामध्ये ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान तपासणी शिबिरामध्ये काही तपासण्या मोफत तर काही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर जिल्हापरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. यासह कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड कंपनीमध्ये कॅन्सर जनजागृती मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. मुख्य कार्यक्रमामध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या हस्ते, कोविड काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या कोविड योध्दाचा सत्कार करण्यात येणार आहे. या पत्रकार बैठकीस डॉ. योगेश अनाप, डॉ. गिरीश भांमरे, डॉ. संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments