Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यामहापालिकेतील बहिऱ्यांना जागे करण्यासाठी आपचे महापालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन घरफाळा घोटाळ्याच्या चौकशीची...

महापालिकेतील बहिऱ्यांना जागे करण्यासाठी आपचे महापालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन घरफाळा घोटाळ्याच्या चौकशीची केली मागणी

महापालिकेतील बहिऱ्यांना जागे करण्यासाठी आपचे महापालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन घरफाळा घोटाळ्याच्या चौकशीची केली मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेत घरफाळा वसुलीमध्ये अनेक गैरव्यवहार झाले आहेत संगणकीय प्रणाली मध्ये बदल करून करपात्र मिळकतींची आकारणी कमी करणे, अनागोंदी करून घरफाळ्यात सूट देणे, मिळकतीचे क्षेत्रफळ सर्वेक्षणात घोळ, एकाच करदात्याला दुबार बिल देऊन त्रास देणे, बनावट दुबार पावत्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करत महापालिकेचे प्रचंड आर्थिक नुकसान करण्यात आले आहे.असा भ्रष्ट कारभार महानगरपालिकेर सध्या सुरू आहे त्यामुळे महानगरपालिकेतील या भ्रष्ट बहिऱ्यांना जागे करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आज महापालिकेसमोर ढोल बाजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी घरफाळा घोटाळ्याच्या ऑडिटची मागणी करण्यात आली. याआधी हा घोटाळा नेमका किती झाला याचा हिशोब लावून नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आम आदमी पार्टीने आयुक्तांकडे निवेदन सादर केले होते. यासंदर्भात चर्चा करून लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करत घोटाळा या संस्थेकडून ऑडिट करण्याची मागणी या वेळी करण्यात आली होती परंतु अद्याप यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये महापालिका परिसर दुमदुमला होता. कार्यकर्त्यांनी घरफाळा घोटाळ्याचे बाह्य संस्थेकडून ऑडिट झाले पाहिजे अशी घोषणा दिली.महानगरपालिकेला जागे करण्यासाठी हे आंदोलन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
२०१० मध्ये संगणकीय प्रणाली सुरू केल्याच्या तीन वर्ष आधीपासून म्हणजे २००७ पासून ते आतापर्यंत घरफाळा वसुलीचे त्रयस्थ विश्वासू संस्थेकडून ऑडिट करण्यात यावे, घरफाळा निश्चित करणारी संगणकीय प्रणालीत सदोष आहे.त्यामध्ये परस्पर बदल करता येऊ शकतात त्यामुळे आता वापरात असणारी संगणकीय प्रणाली पूर्णतः बदलून नवीन प्रणाली विकसित करून घ्यावी जेणेकरून असे घोटाळे कायमचे थांबवता येतील.जी आय एस मॅपिंग प्रणालीचे काम अर्धवट आहे ते पूर्ण करून शहरातील मिळकतीचे क्षेत्रफळ निश्चित करावे व घरफाळा लागू करावा सन २०२०- २१ च्या बजेटमध्ये ८८ कोटींची चालू मागणी दाखवण्यात आली आहे आता मिळालेल्या माहितीनुसार एकूण २५३ कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे एवढी रक्कम थकबाकी असताना फक्त ८८ कोटींची चालू मागणी दाखवण्यात आली याची चौकशी करावी. यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाअध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्ष अमरजा पाटील, संतोष घाटगे, सुरज सूर्वे, आदम शेख, गिरीश पाटील, राज कोरगावकर, राकेश गायकवाड, वैशाली कदम, बसवराज हदी मनी,विशाल पठारे, बाबुराव बाजारी, रामचंद्र गावडे, रघुनाथ मोहिते, पल्लवी पाटील, सुधाकर शिंदे, प्रथमेश सूर्यवंशी, दत्तात्रय सुतार आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments