Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यापाणी बिलाची संपूर्ण थकबाकी जमा केल्यास विलंब आकारामध्ये फेब्रुवारी व मार्चमध्ये सवलत

पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी जमा केल्यास विलंब आकारामध्ये फेब्रुवारी व मार्चमध्ये सवलत

पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी जमा केल्यास विलंब आकारामध्ये फेब्रुवारी व मार्चमध्ये सवलत

कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूर  शहर पाणी पुरवठाविभागाकडील थकीत पाणी बिलाची रक्कम प्रभावीपणे व कार्यक्षमपणे वसुलीकरणेच्या अनुषंगानेमहानगरपालिकेमार्फत फेब्रुवारी व मार्चमध्ये विशेष सवलत योजनाराबविण्यात येत आहे. सदर सवलतयोजने अंतर्गत पाणी बिलाची संपूर्णथकबाकी जमा केल्यास विलंबआकारामध्ये फेब्रुवारी २०२१ अखेर ४० टक्के व मार्च २०२१ अखेर ३० टक्केसूट/सवलत देण्यात येणार आहे.
या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी पाणी बिलाची नागरी सुविधाकेंद्र क्र.१, गांधी मैदान, नागरी सुविधाकेंद्र क्र.२, शिवाजी मार्केट, नागरी सुविधाकेंद्र क्र.३, राजारामपूरी, बागल मार्केट, नागरी सुविधा केंद्र क्र.४, ताराराणीमार्केट, कावळा नाका, नागरी सुविधाकेंद्र, मुख्य इमारत, पाणीबिल वसुली केंद्र,कसबा बावडा व Online Paymentकरणेसाठीwww.kolhapurcorportion.gov.in या वेबसाईटवर Pay Your Taxes Online या सुविधेवर रक्कम भरुन घेण्यात येईल. थकीत पाणी बिलाचीरक्कम नागरी सुविधा केंद्रामध्ये प्रत्यक्षभरणा करताना त्या दिनांका पर्यन्तचाविलंब आकार दर्शविणेत येईल वत्याप्रमाणे सवलतीची रक्कम जमा करुनघेण्यात येईल.
www.kolhapurcorportion.gov.in या वेबसाईटवर Pay Your Taxes Online येथे क्लीक करुनडेबीट कार्ड / क्रेडीट कार्ड /नेटबँकींगद्वारे Online Paymentकरणेची सुविधा उपलब्ध आहे. यासाठीप्रथम एक वेळ रजिस्ट्रेशन करणेआवश्यक आहे. नागरी सुविधा केंद्रामध्येजाऊन जोडणी क्रमांक सांगून पाणीबिलाची रक्कम रोखीने/धनादेश/धनाकर्षद्वारे जमा करता येईल.या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी  पाणीपट्टी व सांडपाणीअधिभार चालू बिलासह थकीत रक्कमएक रक्कमी रोख/धनादेश डीमांडड्राफ्टद्वारे १०० टक्के भरलेनंतरचपाणीपट्टी व सांडपाणी अधिभार यावरीलविलंब आकारामध्ये  फेब्रुवारी २०२१अखेर ४० टक्के व मार्च २०२१ अखेर ३० टक्के सवलत देणेत येईल. योजनेचाकालावधी हा दिनांक ३१ मार्च २०२१अखेर नागरी सुविधा केंद्रामध्येकार्यालयीन वेळेत व ऑनलाईनसुविधेमार्फत रात्री ११.०० पर्यन्तचराहील. सदर सवलत योजनेचा लाभसरकारी/निमसरकारी कार्यालयाकडीलथकबाकीदारांना दिला जाणार नाही. सद्यस्थितीत सदर योजने अंतर्गतमोबाईल स्पॉट कलेक्शन यंत्रणेचासमावेश करणेत आलेला नाही.धनादेशाद्वारे पावती केल्यानंतर धनादेशन वटलेस सदरची पावती रद्द करुनथकीत रक्कम पूर्ववत खातेवर वर्गकरणेत येईल. त्यानंतर ग्राहकास सदरयोजनेचा लाभ घेता येणार नाही. अशाग्राहकांनी विलंब आकारासह संपूर्णथकबाकी रक्कम रोखीने भरणेआवश्यक आहे. सन २००८-२००९ पूर्वीथकबाकीने कनेक्शन बंद केलेले ग्राहकथकीत रक्कम भरणार असतील तर असतील तर पाणीपट्टी विभागाकडीलसंगणक कक्षाशी संपर्क साधून विलंबआकार अद्ययावत करुन घेऊन तद्नंतरनागरी सुविधा केंद्रामध्ये रक्क्म भरणाकरणेची आहे. सदर सवलत योजना हीवर नमूद केलेल्या कालावधीत जमाकेलेल्या रक्कमेलाच लागू राहील. यायोजनेच्या प्रारंभापूर्वी अथवासमाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याहीरक्कमांना लागू राहणार नाही. योजनासुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्याकोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी(Refund) या योजनेअतर्गत दावा करतायेणार नाही. ज्या कालावधीसाठीसवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्याकालावधीचे कोणत्याही प्रलंबीत असलेलेअपील, पुनर्निरीक्षणासाठी आलेलेआवेदन, संदर्भ आवेदन, मा.न्यायालयातदाखल केलेला दावा किंवा रिट याचिकाप्रलंबीत असल्यास ते विनाअट मागेघेतले पाहिजे. यासाठी जल अभियंताकार्यालयाशी संपर्क साधणेचा आहे. जरसवलत योजनेचा लाभ मिळाल्यानंतरअपील, पुनर्निरीक्षण आवेदन, संदर्भआवेदन, मा.न्यायालयात दावा किंवा रिटयाचिका दाखल केली तर आणिभविष्यात पाणीपट्टी कराची रक्कम ज्या-त्या बिलींग कालावधीत जमा न केलेससवलत योजनेनुसार संबंधितकालावधीसाठी दिलेल्या सवलती काढूनघेण्यात येतील याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments