केआयटीमध्ये सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर महाविद्यालयात 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून एम.टेक सिव्हील अॅण्ड स्ट्रक्चरल इंजिनिअरींग या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे. या कोर्ससाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि गेट ही परीक्षा प्राप्त झालेल्या विद्याथ्र्यांना प्रवेश मिळणार आहे. या कोर्समधून विद्यार्थी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आधुनिक स्ट्रक्चर्सची डिझाइन सोबत विविध स्ट्रक्चरल डिझाईन सॉफ्टवेअर्सचे ज्ञान त्यांना अवगत करता येणार आहे.
कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरींग विभागाला एनबीएकडून तीनवेळा नामांकन मिळाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना चांगले प्रात्यक्षिक अनुभव मिळावे यासाठी आवश्यक असणा-या सर्व प्रयोगशाळा या अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह सुसज्ज आहेत.
या अभ्यासक्रमासाठी केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले व महाविद्यालयाचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजूमदार, स्थापत्य विभाग प्रमुख प्रा. मोहन चव्हाण, यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
या कोर्ससाठी समन्वयक म्हणून प्रा. विवेक सुर्यवंशी हे काम पाहत आहेत. इच्छुक विद्याथ्र्यांनी प्रवेशासाठी प्रा. विवेक सुर्यवंशी, स्थापत्य विभाग मोबा. क्र. 8329931386 या किंवा महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.