Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याभरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून दोन जण जागीच ठार

भरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून दोन जण जागीच ठार

भरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून दोन जण जागीच ठार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ नजीक भरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कसबा बावडा येथील दोन तरूण जागीच ठार झाले. रविवार दिनांक १० रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन आबासाहेब रणदिवे, अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. विशाल याचा दहा दिवसापूर्वीच विवाह झाला असून तो बावडा येथे मामाकडे रहायला होता. विशालची पत्नी लग्नानंतर माहेरी गेली आहे, नितीन रणदिवे हा बावडा परिसरातील नावाजलेला क्रिकेटपटू होता, तो विवाहित असून त्याला एक लहान मुलगा आहे. या घटनेने बावडा परिसरावर शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments